भरधाव कारने दुचाकीला उडवले, तरुणाचा मृत्यू

वैजापूर । दीपक बरकसे

भरधाव वेगाने जाणाऱ्या पजेरो कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास वैजापूर-गंगापूर रस्त्यावर चोरवाघल शिवारात घडली. या अपघातात अमोल बाबुराव शिंदे (वय ३२, रा. भगूर) यांचा मृत्यू झाला. (road accident)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल शिंदे हे दुचाकीवरून भगूर गावाकडे जात असताना, गंगापूर-वैजापूर रोडवरील चोरवाघल गावाजवळ चिमणी येथे भरधाव वेगाने आलेल्या पजेरो कारने (क्रमांक एम.एच. १५ जी.एल. ५१४७) त्यांच्या दुचाकीला धडक दिली.

हे वाचलं का? – शिऊरमध्ये रेशनचे धान्य गायब, लाभार्थी वंचित! दुकानदारांकडूनच अफरातफर, ग्रामस्थांचा संताप

या जोरदार अपघातात अमोल गंभीर जखमी झाले. उपस्थित नागरिकांनी तत्काळ त्यांना वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. (Gangapur road accident)

या घटनेबाबत वीरगाव पोलीस ठाण्यात अमोल शिंदे यांच्या मावस भावाने, गुलाब लक्ष्मण धांडे (वय ३५, रा. भगूर) यांनी फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून पजेरो कारचालक पवन नंदलाल भावसार (रा. साईनगर, बुरडगाव रोड, अहिल्यानगर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (bike accident)

हे वाचलं का? – मामाच्या गावी आलेल्या ३ वर्षीय चिमुकलीसोबत अघटित घडलं! बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू

या अपघाताच्या तपासाची जबाबदारी पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोज कुलकर्णी यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची भावना असून, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. (car hits bike)

गेल्या काही महिन्यांत वैजापूर-गंगापूर मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. वेगमर्यादा न पाळणे, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणे आणि वाहने भरधाव वेगाने चालवणे या कारणांमुळे या मार्गावर वारंवार अपघात होत आहेत. प्रशासनाने या मार्गावर अधिक कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. (speeding vehicle crash)

हे वाचलं का? – संतापजनक! सहा वर्षीय चिमुरडीचा विनयभंग, पैशांचे आमिष दाखवून नराधमाने केलं राक्षसी कृत्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here