
वैजापूर । दिपक बरकसे
वैजापूर शहरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पैसे देण्याचे आमिष दाखवत एका नराधमाने सहा वर्षीय बालिकेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना बुधवारी सकाळी पावणे दहा वाजता वैजापूर शहरात घडली. या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. (6-year-old girl molested)
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी रावसाहेब मगर (रा. बजरंग चौक) याने बालिकेला जवळच्या दुकानात नेतो, पैसे देतो असे आमिष दाखवले. त्यानंतर त्याने असभ्य वर्तन करत तिचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. मुलीच्या आईला हा प्रकार समजल्यानंतर तिने तात्काळ पोलिसांत तक्रार दाखल केली. (Vaijapur molestation case)
हे वाचलं का? – धक्कादायक! शेतातील घराला आग लावून पती-पत्नीवर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला
तक्रारीनंतर पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल केला आहे. आरोपीवर भारतीय न्याय संहितेच्या विनयभंगाच्या कलमान्वये तसेच लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण (पोक्सो) कायदा (POCSO Act) आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (Atrocity Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत फुंदे हे करत आहेत. (child safety)
या घटनेनंतर वैजापूर शहरात संतापाची लाट उसळली आहे. नागरिकांनी आरोपीला कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी केली आहे. मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (Vaijapur crime news)
हे वाचलं का? – दोस्त दोस्त ना रहा! मित्रानेच काढला मित्राचा काटा, धारदार शस्त्राने भोसकून खून
या घटनेनंतर पालकांनी आपल्या मुलांचे संरक्षण करण्यासाठी अधिक सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली आहे. मुलांना ओळखीच्या आणि अनोळखी व्यक्तींबाबत सावध राहण्याचे प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. तसेच, प्रशासनाने अशा घटनांना प्रतिबंध करण्यासाठी कठोर पावले उचलण्याची गरज आहे. (child molestation India)
पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, अशा प्रकारच्या घटना उघडकीस आल्यास तातडीने पोलिसांना कळवण्याचे सांगितले आहे. आरोपीवर कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या धक्कादायक घटनेने वैजापूरमध्ये खळबळ माजली असून, समाजानेही बालकांच्या सुरक्षेसाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.
तुमच्या भागातील प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा


