
वैजापूर । दीपक बरकसे
शनिवारी वैजापूरात महाराष्ट्र नाभिक महामंडळाचा तालुका आणि शहर मेळावा संत सेनाजी महाराज समाज मंदिराच्या सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला. या मेळाव्याने नाभिक समाजाच्या एकजुटीचं दर्शन घडवलं. दामोधर बिडवे (बुलढाणा) यांनी अध्यक्षस्थान भूषवलं, तर शहरातील वीर जिवाजी महाले आणि राष्ट्रसंत सेनाजी महाराज यांच्या पुतळ्यांना सामूहिक अभिवादन करत कार्यक्रमाला सुरुवात झाली.
या मेळाव्यात नाभिक समाजाच्या प्रगतीसाठी विविध विषयांवर चर्चा झाली. महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष संतोष बोराडे यांनी ‘महाज्योती’, ‘विश्वकर्मा’, आणि ‘केशशिल्पी’ योजनांबद्दल सविस्तर माहिती दिली. त्यांनी शिक्षण, प्रशिक्षण आणि समाज जागृतीवर भर देताना संघटनेच्या माध्यमातून परिवर्तन कसं घडवता येईल, यावर प्रकाश टाकला. राज्य कार्याध्यक्ष दामोधर बिडवे यांनी समाजाच्या उन्नतीचा आलेख मांडला. त्यांनी मागासलेपण दूर करण्यासाठी महामंडळ कशा पद्धतीने कार्यरत आहे, याचं विश्लेषण केलं. समाजात बदल घडवण्यासाठी एकत्र येण्याचं आवाहन त्यांनी उपस्थितांना केलं.
या मेळाव्याला महामंडळाचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष गजानन झगरे, कोअर कमिटी सदस्य बळीराम वैद्य (जालना), बुलढाणा शहर अध्यक्ष मंगेश बिडवे, शहर सचिव पांडुरंग वरपे, संभाजीनगर मध्यचे शहर अध्यक्ष नीलेश उर्फ बंटी बोर्डे, युवा नेते किरण भांगे (सोलापूर), महिला जिल्हाध्यक्ष लताताई शेजुळ (छत्रपती संभाजीनगर), पैठणचे तालुका उपाध्यक्ष विठ्ठल छडीदार, फुलंब्रीचे नितीन वाघ आणि योगेश वखरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
(ट्रेंडिंग बातमी – फुग्याने घेतला चिमुकलीचा जीव, मन सुन्न करणारी घटना… नेमकं काय घडलं?)
मेळाव्याचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे वैजापूर तालुका, शहर आणि युवा कार्यकारिणीची पुनर्रचना. नव्या चेहऱ्यांना संधी देत नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली.
वैजापूर शहर नाभिक संघटना कार्यकारिणी:
- अध्यक्ष: सतीश अरुण अनर्थे
- उपाध्यक्ष: सुरेश विष्णू जाधव
- सचिव: रविंद्र मुरलीधर अनर्थे
- सहसचिव: ऋषिकेश राजेंद्र अनर्थे, किरण शिवाजी अनर्थे
- प्रसिद्धी प्रमुख: दीपक गणेशराव अनर्थे
युवा कार्यकारिणी
- अध्यक्ष: इंद्रजित रघुनाथ जाधव
- उपाध्यक्ष: बजरंग दिबंगर अनर्थे
- सचिव: पवन फकिरराव विश्वासू
- सहसचिव: नीलेश दिनकर अनर्थे
- कोषाध्यक्ष: मोरेश्वर मदनराव अनर्थे
- कार्याध्यक्ष: प्रतीक विलासराव अनर्थे
- प्रसिद्धी प्रमुख: दीपक गणेशराव अनर्थे
यावेळी वीर जिवाजी महाले प्रतिष्ठानच्या कार्यकारिणीचीही घोषणा करण्यात आली. या प्रतिष्ठानाच्या माध्यमातून समाजकार्यासाठी नवे पाऊल टाकण्याचा संकल्प व्यक्त झाला. विशेष म्हणजे, वीर जिवाजी महाले यांच्या पुतळ्यासाठी झालेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या नाभिक समाजातील कार्यकर्त्यांचा सत्कारही करण्यात आला.
वैजापूर तालुका आणि शहरातून नाभिक समाजाचे बांधव मोठ्या संख्येने या मेळाव्यासाठी जमले. त्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला उत्साहाचं वातावरण प्राप्त झालं. या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी गणेश अनर्थे, रवींद्र सहज, नवनाथ बोर्डे, उमेश घोडके, पांडुरंग अनर्थे आणि मच्छिंद्र बिडवे यांच्यासह अनेकांनी मेहनत घेतली.
कार्यक्रमाच्या शेवटी तालुकाध्यक्ष संतोष गायके यांनी सर्वांचे आभार मानले. त्यांनी समाजाच्या प्रगतीसाठी एकजुटीने काम करण्याचा संकल्प उपस्थितांसमोर ठेवला. हा मेळावा केवळ एका बैठकीपुरता मर्यादित न राहता समाजाला नव्या दिशेने नेणारा ठरावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
तुमच्या भागातील प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा


