बिबट्याचा चिमुरडीवर हल्ला; १०० फूट फरफटत नेलं अन् केलं ठार

गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा मानवी वस्तीत वावर वाढत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. राहाता तालुक्यात बिबट्याने एका सात वर्षांच्या मुलीवर (Leopard attacks ) हल्ला केला आणि शंभर फूट फरफटत नेऊन तिला ठार मारलं.

राहाता तालुक्यात असलेल्या धनगरवाडी गावात ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. धनगरवाडीतील संतोष राशिनकर यांच्या वस्तीजवळ ही दुर्दैवी घटना घडली. (leopard attack Dhangarwadi)

हे वाचलं का? – चिमुकल्या पुतणीसाठी ९ महिन्यांची गर्भवती बिबट्याला भिडली! वैजापूरच्या आधुनिक हिरकणी पल्लवीताईंची गोष्ट

रात्री नऊच्या सुमारास संतोष यांची मुलगी स्नेहल (वय ७) घरासमोर खेळत असताना दबा धरून बसलेल्या बिबट्यानं तिच्यावर झडप घातली. बिबट्यानं स्नेहलला तब्बल शंभर फूट फरफटत नेलं. गावकऱ्यांनी आरडाओरड केल्यावर बिबट्या तिला सोडून पळून गेला. (Rahata leopard incident)

स्नेहलला तातडीनं प्रवरा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करताच तिला मृत घोषित केलं. या घटनेनं राशिनकर कुटुंबावर आणि संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच धनगरवाडीचे उपसरपंच साहेबराव आदमाने यांनी वन विभागाला संपर्क साधला. (forest department inaction)

हे वाचलं का? –  बिबट्यांना मारण्याची परवानगी द्या; सुजय विखेंची मागणी, जनहित याचिका दाखल करणार

रात्रीच वन विभागाचे अधिकारी सानप, साखरे, बर्डे आणि सुराशे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पंचनामा केला. पण बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्याबाबत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. या हल्ल्यानंतर धनगरवाडीतील नागरिकांनी वन विभागाकडे तीव्र नाराजी व्यक्त केली. “या परिसरात लवकरात लवकर पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावं,” अशी मागणी सरपंच, उपसरपंच आणि गावकऱ्यांनी लावून धरली आहे. वन खात्यानं दक्षता घ्यावी, असंही त्यांचं म्हणणं आहे. (Maharashtra leopard attack)

तुमच्या भागातील प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here