
ट्रॅक्टरवरून पडून साडेतीन वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना वैजापूर तालुक्यातील लाख खंडाळा शिवारात शनिवार रोजी घडली. शिवांश पंकज गोंदकर वय साडेतीन वर्षे राहणार लाख खंडाळा असे घटनेतील मयत चिमुकल्याचे नाव आहे.
या घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार शिवांश हा लाख खंडाळा शिवारात ट्रॅक्टर वरून पडून गंभीर जखमी झाला होता. त्याला उपस्थित नागरिकांनी बेशुद्ध अवस्थेत शनिवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
हे वाचलं का? – छावा चित्रपटाला ‘मराठा क्रांती मोर्चा’चा विरोध, संभाजी राजेंचीही नाराजी… शंभूराजे अन् येसूबाईंच्या ‘या’ सीनमुळे वाद पेटला
मात्र वैद्यकीय अधिकारी यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. या प्रकरणात वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार वैजापूर पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली आहे. तर या प्रकरणाचा अधिक तपास वैजापूर पोलीस ठाण्याचे संदीप पवार हे करीत आहेत. ही घटना परिसरात शोककळा पसरवणारी ठरली असून, चिमुकल्याच्या मृत्यूमुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
तुमच्या भागातील प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा



