चोरट्यांनी सराफाचे दुकान फोडले; ८० हजाराचा ऐवज लंपास

वैजापूर । दिपक बरकसे

तालुक्यातील महालगाव येथे सराफाच्या दुकानात चोरीची घटना रविवारी (दि. २६) पहाटे उघडकीस आली. चोरट्यांनी शटरचे कुलूप तोडून दुकानात प्रवेश करत सुमारे ८० हजार रुपयांची ईमिटेशन ज्वेलरी लंपास केली.

हे वाचलं का? – छावा चित्रपटाला ‘मराठा क्रांती मोर्चा’चा विरोध, संभाजी राजेंचीही नाराजी… शंभूराजे अन् येसूबाईंच्या ‘या’ सीनमुळे वाद पेटला

विरगाव पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून, पुढील तपास सुरू केला आहे. चोरीच्या या घटनेने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेनंतर महालगावसह परिसरातील व्यापाऱ्यांनी पोलिस गस्त वाढवण्याची मागणी केली आहे. चोरीच्या वारंवार होणाऱ्या घटनांमुळे व्यापारी वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

तुमच्या भागातील प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here