कापुसवाडगाव येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी

वैजापूर तालुक्यातील कापुसवाडगाव येथे अंगणवाडी 1 आणि 2 मधील चिमुकल्यांनी समाजसुधारिका सावित्रीबाई फुले यांची 294 वी जयंती व महिला शिक्षण दिन साजरा केला.

प्रथम सावित्रीबाईच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. लहान मुलींनी सावित्रीबाईंची पारंपरिक वेशभूषा करून त्यांच्या बद्दल आदर व्यक्त केला. उपस्थित यांनी महिला शिक्षण दिनानिमित्त मुलींच्या शिक्षणाचे महत्व विशद केले.

हे वाचलं का? – ना हरकत प्रमाणपत्रासाठी तीन लाखांची मागणी, उपसरपंचासह दोघांवर गुन्हा दाखल

या प्रसंगी उपस्थित गावच्या उपसरपंच मंदाबाई थोरात, नानासाहेब थोरात, सचिन निगळ, गोरख त्रिभुवन, बाळासाहेब कवडे, सुधीर फुकटे, राहुल फुकटे, अर्जुन तेलंगे, सुनील थोरात, अंगणवाडी सेविका अश्विनी सोनवणे, भाग्यश्री पवार, शोभा गोरक्ष, छाया थोरात व ग्रामस्थ उपस्थित होते.

तुमच्या भागातील प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here