
वैजापूर । दिपक बरकसे
जुन्या भांडणावरुन नगरपरिषद कर्मचाऱ्यास शिविगाळ करुन लाकडी दांडक्याने डाव्या पायावर मारुन जीवे मारण्याच्या उद्देशाने गळ्यावर कोयत्याने वार केला. या घटनेत त्यांच्या डाव्या हाताच्या पंजाला कोयता लागुन दुखापत झाली. ही घटना शुक्रवारी (१४ मार्च) दुपारी चार वाजेच्या सुमारास विरभद्र मंदिर परिसरात घडली. (Maharashtra Crime Updates)
या घटनेत नगरपरिषद शिपाई सुरज बाबासाहेब भगत (राहणार धनगर गल्ली) हे जखमी झाले असुन त्यांनी फिर्याद दिल्यानंतर पवन राजपूत, प्रशांत राजपूत व शुभम राजपूत (राहणार वैजापूर) या तिघांविरुद्ध पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसेच जखमीस उपचारासाठी वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Vaijapur crime news)
हे वाचलं का? – उपविभागीय कार्यालयाच्या दारातच तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न; वैजापूरातील धक्कादायक घटना
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरज भगत हे नगरपरिषदेत शिपाई म्हणुन कामावर असुन त्यांना पथदिवे चालु व बंद करण्याचेही काम देण्यात आले आहे. एक महिन्यापुर्वी नगरपरिषदेचे स्ट्रीट लाईटचे काम करत असतांना विद्युत खांबावरुन पडल्याने त्यांच्या मांडीला मार लागला आहे. त्यामुळे भगत हे त्यांचा मित्र तुषार अनिल पठारे यास मदतीसाठी सोबत घेऊन मोटारसायकलवरुन पथदिवे चालु बंद करण्याचे काम करतात. (agar Parishad Employee Assault)
हे वाचलं का? – राजकारणात मोठी उलथापालथ! ‘मविआ’ साफ, अनेक दिग्गज नेत्यांचा भाजपात प्रवेश
१४ मार्चला हे दोघे विरभद्र मंदिराजवळ पथदिवे सुरु करण्याचे काम करत असतांना आरोपी पवन राजपूत, प्रशांत राजपूत व शुभम राजपूत हे तिघे मोटारसायकलवर तिथे आले. यावेळी तुषार पठारे हा त्यांना पाहुन पळवुन गेला. या दोघांचेही त्यांच्याशी जुने भांडण असल्याने तुषारने तेथुन पळ काढला. मात्र सुरज भगत तेथेच थांबले. (Vaijapur Nagar Parishad Attack)
त्यावेळी प्रशांत राजपूत जवळ आला व त्याने सुरज भगत यांना तुषारला फोन करण्यास सांगितले. फोन करण्यास नकार देताच तिघांनी सुरज भगत यांना शिविगाळ केली, लाकडी दांड्याने मारहाण केली तसेच जीवे मारण्याच्या उद्देशाने कोयत्याने वार केला असे पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हंटले आहे. त्यावरुन आरोपींविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास पोलिस करीत आहेत. (Murder Case)
तुमच्या भागातील प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा


