धक्कादायक! शेतातील घराला आग लावून पती-पत्नीवर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला

वैजापूर । दिपक बरकसे

वैजापूर तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. शेतातील पत्र्याच्या घराला आग लावून, कुऱ्हाडीने हल्ला करत दोन जणांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची गंभीर घटना घडली आहे. ही घटना नागमठान येथील चामले वस्ती गट क्रमांक ५८ मध्ये घडली.

याप्रकरणी रवींद्र हंसराज तांबे (वय २५, रा. नागमठान) याच्याविरुद्ध वीरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगल सोपान चामले (वय ५०) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी रवींद्र तांबे याने त्यांच्या पती सोपान चामले यांना शेतात ट्रॅक्टर घेऊन जाण्याच्या कारणावरून वाद निर्माण केला.

हे वाचलं का? – उपविभागीय कार्यालयाच्या दारातच तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न; वैजापूरातील धक्कादायक घटना

त्यानंतर रवींद्रने शेतातील पत्र्याच्या घराला आग लावली आणि सोपान चामले यांच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार करून त्यांना गंभीर जखमी केले. त्यानंतर आरोपीने मंगल चामले यांच्या डोक्यावर देखील कुऱ्हाडीने वार करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी ते वार टाळले असले तरी त्यांच्या उजव्या हाताला गंभीर इजा झाली आहे.

जखमींना तात्काळ वैजापूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वीरगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मनोज पाटील करत आहेत.

हे वाचलं का? – राजकारणात मोठी उलथापालथ! ‘मविआ’ साफ, अनेक दिग्गज नेत्यांचा भाजपात प्रवेश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here