Samruddhi Expressway: समृद्धी महामार्गावर धावत्या कारला अचानक आग, जीवितहानी टळली

वैजापूर । दिपक बरकसे

वैजापूर तालुक्यातील समृद्धी महामार्गावर (Samruddhi Expressway Car Fire) पालखेड गोळवाडी शिवारात एका भरधाव कारला अचानक आग लागण्याची घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

प्राथमिक माहितीनुसार, शनिवार सायंकाळी सुमारे सात वाजता छत्रपती संभाजीनगरकडे जात असलेल्या कारला पालखेड गोळवाडी परिसरात अचानक आग लागली. आग लागल्याचे लक्षात येताच कारमधील प्रवासी तात्काळ खाली उतरले, त्यामुळे संभाव्य मोठा अपघात टळला. (Vaijapur Accident News)

हे वाचलं का? –  रात्रीच्या प्रवासातील ‘डेथ अवर्स’! अभ्यासातून धक्कादायक माहिती समोर

घटनेत कार पूर्णपणे जळून खाक झाली असून, वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, सुदैवाने कोणत्याही व्यक्तीला इजा झाली नाही. महामार्गावरील सुरक्षेच्या दृष्टीने या प्रकाराने प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला आहे. (Samruddhi Expressway Safety)

हे वाचलं का? – वाहनचालकांनो सावधान! ‘ब्लाइंड मर्जर ऍक्सिडेंट’ टाळण्यासाठी ‘हे’ नियम पाळाच

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here