गावकऱ्यांच्या सतर्कतेने गोमांस विक्री करणारा रंगेहाथ पकडला

ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे गोवंश जातीच्या जनावरांचे मांस विक्रीसाठी आणणाऱ्या इसमाला रंगेहाथ पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ही घटना १३ फेब्रुवारी रोजी सकाळच्या बाजाठाण (ता. गंगापूर) येथे घडली.

या प्रकरणी विरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी शरद जालिंदर चौधरी (वय २४, रा. बाजाठाण) यांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते ९.१५ च्या सुमारास हमरापूर गावाचे सरपंच संजय मोरे यांनी त्यांना फोन करून माहिती दिली की, एका इसमाने गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल करून मांस विक्रीसाठी आणले असून, ग्रामस्थांच्या विचारणेनंतर तो बाजाठाणच्या दिशेने पळून गेला आहे.

हे वाचलं का? – प्रेमात आंधळ्या झालेल्या आईनेच पोटच्या गोळ्याला संपवलं, अनैतिक संबंधातून प्रियकराच्या मदतीने काढला काटा

यानंतर फिर्यादी व गावातील काही लोकांनी त्याचा पाठलाग करून बाजाठाण येथील शिवगिरी मठासमोर त्याला रोखले. गावकऱ्यांना पाहून संशयिताने पळ काढला, मात्र धावपळीच्या दरम्यान तो मोटरसायकलसह खाली पडला. त्याला पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण तो पुन्हा पळू लागला. अखेर तो एका नाल्यात पडला आणि ग्रामस्थांनी त्याला पकडून त्याचे नाव विचारले. त्याने आपले नाव हबीब युसुफ कुरेशी (वय ४२, रा. चमनपुरा, गंगापूर) असे सांगितले. त्याच्या मोटरसायकलजवळ पडलेल्या पोत्यामध्ये गोवंश जातीच्या जनावराचे मांस आढळून आले.

हे वाचलं का? – जिल्हा बँकेच्या महिला कॅशिअरचा विनयभंग, तालुका विकास अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

त्यानंतर गावाचे पोलीस पाटील विजय भराडे यांनी तत्काळ विरगाव पोलिसांना कळवले. पोलीस घटनास्थळी दाखल झाले व हबीब युसुफ कुरेशी याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून ४० हजार रुपये किमतीची दुचाकी आणि १६ हजार रुपये किमतीचे ८० किलो गोमांस जप्त करण्यात आले. या प्रकरणी महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास विरगाव पोलीस करीत आहेत.

प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here