धक्कादायक! आश्रमात महिला कीर्तनकाराची क्रूर हत्या, दगडाने ठेचून संपवलं Kirtankar Sangita Pawar Murder Case| Photo Credit: Deepak Barkase, Canva, Edited

वैजापूर । दिपक बरकसे

वैजापूर-गंगापूर महामार्गावरील चिंचडगाव येथील सदगुरु नारायणगिरी कन्या आश्रमात राहणाऱ्या ह.भ.प. संगीता ताई पवार (वय 50) यांची अज्ञात व्यक्तींनी डोक्यात दगड घालून क्रूरपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. (Vaijapur murder) ही घटना शुक्रवारी (दि. 27) मध्यरात्री 11 ते 12 वाजण्याच्या सुमारास घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. चोरीच्या उद्देशाने आश्रमात घुसलेल्या अज्ञातांनी ही हत्या केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. (Chinchadgaon ashram killing)

संगीता ताई पवार या मागील दोन महिन्यांपासून चिंचडगाव येथील सदगुरु नारायणगिरी कन्या आश्रमात (Sadguru Narayangiri Kanya Ashram) वास्तव्यास होत्या. त्या अविवाहित असून, त्यांनी संन्यास स्वीकारला होता. परिसरात त्या कीर्तनकार म्हणून ओळखल्या जात होत्या आणि नियमितपणे कीर्तनाचे कार्यक्रम करत असत. दररोज रात्री त्या आश्रमातील आपल्या खोलीतच झोपत असत, परंतु बुधवारी रात्री त्या खोलीबाहेर झोपल्या होत्या, अशी माहिती समोर आली आहे. (Female kirtankar murder)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी मध्यरात्री 11 ते 12 वाजण्याच्या सुमारास काही अज्ञात व्यक्तींनी आश्रमाचे गेट आणि कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरीच्या उद्देशाने आलेल्या या व्यक्तींनी संगीता ताई पवार यांच्या डोक्यात मोठा दगड टाकून त्यांची हत्या केली. यावेळी आश्रमाजवळील मोहटा देवी मंदिराची दानपेटीही चोरीला गेल्याचे नंतर उघडकीस आले. (Virgaon police investigation)

हे वाचलं का? – शाळेच्या आवारात रक्ताचा सडा! आठवीतल्या विद्यार्थ्याकडून दहावीतल्या विद्यार्थ्यावर चाकूने सपासप वार, जीवघेणा हल्ल्यात मुलाचा मृत्यू

गुरुवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मोहटा देवी मंदिराचे पुजारी शिवाजी चौधरी आश्रम परिसरात आले असता त्यांना आश्रमाचे गेट आणि कुलूप तोडलेले दिसले. आत प्रवेश केल्यानंतर त्यांना संगीता ताई रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या. त्यांनी तातडीने गावकऱ्यांना आणि वैजापूर व विरगाव पोलिसांना याची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी श्वान पथकासह घटनास्थळी धाव घेतली. (Brutal murder case)

पोलिसांचा तपास सुरू

घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी तात्काळ पंचनामा केला. संगीता ताई यांचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा बारकाईने तपास केला असता, मंदिराची दानपेटी चोरीला गेल्याचे आढळून आले. विरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. (Sangeeta Pawar murder case)

या घटनेमुळे चिंचडगाव आणि परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. संगीता ताई या त्यांच्या कीर्तन आणि धार्मिक कार्यासाठी परिचित होत्या. त्यांच्या अकस्मात आणि क्रूर हत्येने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गावकऱ्यांनी पोलिसांना तातडीने या प्रकरणातील गुन्हेगारांचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. (Headlines Marathi)

हे वाचलं का? – हादरवणारी घटना! आधी मुलीचा गळा आवळून खून केला, मग स्वत:ला संपवलं…; पोलीस बापानं एवढं टोकाचं पाऊल का उचललं?

विरगाव पोलिसांनी या प्रकरणी कोणतीही माहिती असणाऱ्या व्यक्तींना पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. अज्ञात हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी श्वान पथकासह तपास यंत्रणा कार्यरत आहे. या घटनेचा तपास लवकर पूर्ण होऊन गुन्हेगारांना अटक होईल, अशी आशा गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे. घटनेची माहिती मिळताच आ रमेश बोरनारे हे दाखल झाले. (temple donation box theft)

या घटनेने परिसरातील धार्मिक स्थळांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आश्रम आणि मंदिरांसारख्या ठिकाणी रात्रीच्या वेळी पुरेशी सुरक्षा व्यवस्था नसल्याने अशा घटना घडत असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये सुरू आहे. पोलिसांनी याप्रकरणी तपास तीव्र करून लवकरात लवकर गुन्हेगारांना पकडावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. (Headlines Marathi Crime News)

ताज्या बातम्यांचे अपडेट्स थेट आपल्या फोनवर मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलला लगेच जॉइन करा! येथे क्लिक करा.

Get the latest Marathi newsMaharashtra news, and updates from politicselectionsportsentertainmenthealthagriculturebusiness, and religion – only on headlinesmarathi.com.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here