
‘कांटा लगा’ या सुपरहिट रिमिक्स गाण्यामुळे घराघरात पोहोचलेली आणि रातोरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री शेफाली जरीवाला (Shefali Jariwala death) हिचं निधन झाल्याने मनोरंजनसृष्टीत शोककळा पसरली आहे. शुक्रवारी सकाळी छातीत वेदना जाणवल्यानंतर तिला रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला, अशी माहिती समोर आली आहे. (Kaanta Laga actress died)
रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू
शेफाली तिचा पती अभिनेता पराग त्यागी याच्यासोबत मुंबईतील अंधेरीच्या लोखंडवाला भागात राहत होती. शुक्रवारी सकाळी सुमारे ११ वाजता तिची तब्येत अचानक बिघडली. तातडीने तिला बेलेव्ह्यू रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती तिला मृत घोषित केलं. या बातमीने तिचे चाहते, सहकलाकार आणि चाहते हळहळले आहेत. (Shefali Jariwala cardiac arrest)

‘कांटा लगा’ने मिळवली जबरदस्त ओळख
2002 मध्ये प्रदर्शित झालेलं ‘कांटा लगा’ हे म्युझिक रिमिक्स गाणं तुफान गाजलं. शेफालीचा यातला बोल्ड लूक आणि जबरदस्त डान्स परफॉर्मन्स लक्ष वेधून घेणारा होता. हे गाणं मूळतः 1964 सालच्या ‘समझौता’ चित्रपटातील होते, ज्यात लता मंगेशकर यांनी आवाज दिला होता आणि संगीत कल्याणजी-आनंदजी यांचं होतं. मात्र शेफालीच्या नव्या रूपात हे गाणं प्रचंड गाजलं आणि तिची ओळख निर्माण झाली. (Shefali Jariwala funeral news)

मनोरंजन क्षेत्रात विविध प्रयोग (Shefali Jariwala biography)
शेफाली जरीवालाने अभिनय आणि डान्स यांचं उत्कृष्ट मिश्रण सादर करत ‘नच बलिए 5’ आणि ‘नच बलिए 7’ या रिअॅलिटी शोजमध्ये भाग घेतला होता. 2019 मध्ये ती ‘बिग बॉस 13’ मध्ये स्पर्धक म्हणून दिसली होती. याशिवाय तिने काही चित्रपटांमध्येही काम केलं होतं आणि इव्हेंट्स व ब्रँड एंडोर्समेंटमधून चांगली कमाई केली होती. (celebrity deaths today)

शेफालीचं वैयक्तिक आयुष्य
शेफालीचा जन्म 15 डिसेंबर 1982 रोजी गुजरातमधील अहमदाबाद येथे झाला. तिने संगणक अनुप्रयोगात पदवी मिळवली होती. तिचं पहिलं लग्न 2004 मध्ये मीत ब्रदर्समधील हरमीत सिंग यांच्याशी झालं होतं, मात्र 2009 मध्ये घटस्फोट झाला. 2015 मध्ये तिने पराग त्यागीशी (Shefali Jariwala husband) पुनर्विवाह केला. पराग आणि शेफाली यांचं नातं प्रेमळ आणि समर्पित मानलं जात होतं. (Bigg Boss Shefali Jariwala death)

राजेशाही आयुष्य आणि संपत्ती
मीडिया रिपोर्ट्सनुसार, शेफाली जरीवालाकडे जवळपास 7.5 कोटी रुपयांची संपत्ती होती. ती एका शोसाठी 10 ते 25 लाख रुपये मानधन घेणारी अभिनेत्री होती. इंस्टाग्राम प्रमोशन, रिअॅलिटी शोज, ब्रँड जाहिराती आणि बिझनेस इन्व्हेस्टमेंट्समधून तिने भरपूर कमाई केली होती. (Parag Tyagi wife passed away)

शेफालीच्या आकस्मिक निधनामुळे मनोरंजन विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे. सोशल मीडियावर अनेक चाहत्यांनी आणि सेलिब्रिटींनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. तिचा तेजस्वी चेहरा आणि उत्साही वावर कायम आठवणीत राहील. (Headlines Marathi)
Get the latest Marathi news, Maharashtra news, and updates from politics, election, sports, entertainment, health, agriculture, business, and religion – only on headlinesmarathi.com.


