आठवीतल्या विद्यार्थ्याकडून दहावीतल्या विद्यार्थ्यावर चाकूने सपासप वार, जीवघेणा हल्ल्यात मुलाचा मृत्यू

अहिल्यानगर शहरातील एका नामांकित शाळेत बुधवारी दुपारी घडलेली घटना संपूर्ण परिसरात भितीचे आणि संतापजनक वातावरण निर्माण करणारी ठरली. (Ahilyanagar school stabbing) फक्त क्रिकेटच्या किरकोळ वादातून दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांमध्ये सुरू झालेलं भांडण इतकं टोकाला गेलं की, त्याचा शेवट थेट निर्घृण हत्येत झाला. (Ahilyanagar student stabbing)

एका १३ वर्षीय आठवीच्या विद्यार्थ्याने दहावीमध्ये शिकणाऱ्या १५ वर्षीय विद्यार्थ्यावर चाकूने वार करत त्याचा खून केला. या हल्ल्यात मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव मुस्तकीन तन्वीर शेख (वय १५, रा. कॅम्प कौलारू, सर्जेपुरा) असे असून तो सध्या दहावीत शिकत होता. हल्ला करणारा मुलगा आठवीचा विद्यार्थी असून दोघेही एकाच शाळेतील आहेत. या दोन्ही मुलांच्या कुटुंबांमध्ये पूर्वीपासूनच वाद होते, अशी माहिती समोर आली आहे. (School violence Ahilyanagar)

मिळालेल्या माहितीनुसार, शाळा सुटल्यावर दोघांमध्ये पुन्हा एकदा वाद झाला. या वादाचा शेवट अत्यंत भयंकर ठरला. (Student murder case) शाळेच्या ऑफिसजवळ मुस्तकीन उभा असताना, आठवीतील विद्यार्थ्याने त्याच्यावर अचानक चाकूने हल्ला केला. त्याने मुस्तकीनच्या मानेवर वार करत पोटात चाकू खुपसला. रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या मुस्तकीनला तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

हे वाचलं का? – कोकण कड्यावर भयंकर घडलं! ४० वर्षीय तलाठ्याने तरुणीसह आयुष्य संपवलं; चिठ्ठीत बरचं काही लिहून ठेवलं, नेमकं काय घडलं?

शाळेत भीती आणि संतापाचे वातावरण

घटनेनंतर संपूर्ण शाळेत भीतीचे वातावरण पसरले. शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी तात्काळ हस्तक्षेप केला, पण हल्ला इतका अचानक आणि वेगाने झाला की काही करता आले नाही. या घटनेनंतर पालक आणि स्थानिक नागरिक शाळा प्रशासनाविरोधात संतप्त झाले आहेत. (Knife attack in school)

पोलिसांनी घेतला ताब्यात, गुन्हा दाखल

तोफखाना पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि हल्लेखोर अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. या प्रकरणी मृत मुस्तकीनचे वडील तन्वीर शेख यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. (Student killed in school)

हे वाचलं का? – धक्कादायक! पतीने कोयत्याने वार करत पत्नीला संपवलं; रूममधील भिंतीवर उडाल्या रक्ताच्या चिळकांड्या, नेमकं काय घडलं?

शाळेतील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

या घटनेमुळे शाळेतील सुरक्षाव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. विद्यार्थ्याच्या हातात चाकू कसा आला आणि तो शाळेत कसा पोहोचला, याबाबत पालक आणि नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. शाळा प्रशासनावर सुरक्षेच्या मुद्द्यावर जबाबदारी निश्चित करण्याची मागणी होत आहे. या प्रकरणाने शाळांमधील सुरक्षा यंत्रणेचा पुनर्विचार करण्याची गरज अधोरेखित झाली आहे. (Headlines Marathi)

शहरातील या घटनेने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, शाळांमध्ये कडक सुरक्षा उपाययोजना राबवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, पुढील कारवाई सुरू आहे. (Headlines Marathi News)

ताज्या बातम्यांचे अपडेट्स थेट आपल्या फोनवर मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलला लगेच जॉइन करा! येथे क्लिक करा.

Get the latest Marathi newsMaharashtra news, and updates from politicselectionsportsentertainmenthealthagriculturebusiness, and religion – only on headlinesmarathi.com.

Class 10 Student Fatally Stabbed by Class 8 Boy Over Cricket Dispute in Ahilyanagar School

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here