
वैजापूर । दिपक बरकसे
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबईच्या छत्रपती संभाजीनगर (ग्रामीण) जिल्हाध्यक्षपदी दैनिक सकाळचे प्रतिनिधी कमलाकर रासने यांची निवड करण्यात आली आहे.
संघटनेचे प्रदेश अध्यक्ष गोविंद वाकडे व संघटक संजयजी भोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे यांनी रासने यांना नियुक्तीपत्र प्रदान केले. या वेळी समाजसेवक नाणजीभाई ठक्कर, दैनिक गावकरीचे कार्यकारी संपादक नवनाथ जाधव, मुंबई विभागीय संपादक दशरथ चव्हाण, महाव्यवस्थापक संजय फुलसंदर, भाऊसाहेब वाकचौरे, मराठवाडा संपर्क प्रमुख कुंडलिक वाळेकर, जिल्हा कार्याध्यक्ष मुजीब खान आदी उपस्थित होते.
कमलाकर रासने यांच्या नियुक्तीबद्दल आमदार प्रा. रमेश बोरनारे, माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर, जिल्हा बँकेचे संचालक व माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी, माजी शिक्षण व आरोग्य सभापती अविनाश गलांडे, अमोल मलिक, जिल्हाध्यक्ष डॉ. प्रभु गोरे तसेच अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले. यामध्ये भानूदास धामणे, भाऊसाहेब झिंजुर्डे, शिवसेना उपतालुका प्रमुख डॉ. प्रकाश शेळके, मंगेश गायकवाड, रामेश्वर पाटोळे, हरिभाऊ आल्हाट, नानासाहेब काळे, रजनिकांत नजन, नवनाथ गायकवाड, मच्छिंद्र शेळके, रोहिदास शेळके, काकासाहेब पडवळ, तालुकाध्यक्ष दीपक बरकसे, हसन सय्यद, तैमूर सय्यद, शांताराम मगर, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष शैलेश खैरमोडे, राजेंद्र जानराव, जगदीश निकम, सोमनाथ तांबे, प्रकाश आल्हाट आदींचा समावेश आहे.
कमलाकर रासने यांच्या निवडीमुळे पत्रकारितेच्या क्षेत्रात नव्या उमेदीने कार्य करण्याची संधी उपलब्ध झाली असून, त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
तुमच्या भागातील प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा


