
वैजापूर । दिपक बरकसे
उद्योजक विनोद राजपूत यांनी भारतीय जनता पक्षात (भाजप) अधिकृत प्रवेश केला आहे. मुंबईत झालेल्या एका विशेष कार्यक्रमात त्यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.
पक्षात सामील झाल्यानंतर विनोद राजपूत यांनी समाजसेवा आणि पक्षसंघटनासाठी कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. विशेषतः गोरगरीब जनतेच्या हितासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राजपूत यांच्या भाजप प्रवेशानंतर स्थानिक नागरिक व समर्थकांनी त्यांचे स्वागत करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या या निर्णयामुळे भाजप संघटनेस बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
तुमच्या भागातील प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा


