
राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं. त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटप देखील जाहीर झालं. यातच विधानसभेचं हिवाळी अधिवेशन देखील पार पडलं.
मात्र, सरकार स्थापन होऊन आज जवळपास १८ दिवस झाले आहेत. तरीही अद्याप लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता महिलांना मिळालेला नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? याबाबत आता राज्यभरातून प्रश्न विचारले जात आहेत.
दरम्यान, हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशन संपताच लाभार्थी महिलांना डिसेंबर महिन्याचे पैसे मिळणार असल्याचे स्पष्ट सांगितले होते. अशातच लाडकी बहीण योजनेसंदर्भातील मोठी अपडेट समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता याच आठवड्यात मिळणार आहे.
तर पहिल्या टप्प्यात ३५ लाख महिलांना या योजनेचे पैसे मिळणार आहे. तर उर्वरित महिलांना दुसऱ्या टप्प्यात या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. हफ्ता देण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होणार आहे. त्यामुळे डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत लाडक्या बहिणींना या महिन्याचा हफ्ता त्यांच्या खात्यात जमा झालेला दिसणार आहे.



