
वैजापूर । दिपक बरकसे
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी इयत्ता बारावीची बोर्डाची परीक्षा (Maharashtra HSC Exam 2025) राज्यभरात आजपासून (११ फेब्रुवारी ) सुरू झाली आहे. सकाळी ११ वाजता राज्यभरातील परीक्षा केंद्रांवर बारावी बोर्डाच्या पहिल्या पेपरला सुरुवात झाली. याचदरम्यान परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, वैजापूर (Vaijapur) तालुक्यातील विद्यार्थी परीक्षेसाठी आपल्या परीक्षा केंद्राकडे (12th Board Exam) सकाळच्या सुमारास निघाले होते. परीक्षा ११ वाजता सुरू होणार होती आणि त्यापूर्वी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचायचे होते. विद्यार्थी गाडीने परीक्षा केद्रावर जात असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी उलटली. या अपघातात पाच विद्यार्थी जखमी झाले असून एका विद्यार्थ्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. जखमी विद्यार्थी (Student Accident News) खंडाळा गावचे असल्याची माहिती समोर येत आहे.
हे वाचलं का? – प्रेमात आंधळ्या झालेल्या आईनेच पोटच्या गोळ्याला संपवलं, अनैतिक संबंधातून प्रियकराच्या मदतीने काढला काटा
विद्यार्थ्यांच्या गाडीला अपघात झाल्याची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. सर्व विद्यार्थ्यांना अपघातग्रस्त गाडीतून बाहेर काढले. या पाच विद्यार्थ्यांपैकी चार विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली होती. ४ किरकोळ जखमी विद्यार्थी जखमांचा बाऊ न करता आपल्या भविष्यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावर पोहोचले. तर एका विद्यार्थ्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला उपचारासाठी तातडीने वैजापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. (HSC Exam Latest Update)
हे वाचलं का? – धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर अत्याचारासाठी १०० रुपयांची सुपारी, हत्येचा ही होता प्लॅन पण…; इंग्रजी शाळेतील खळबळजनक प्रकार
यंदाच्या वर्षी राज्यात एकूण १५ लाख ५ हजार ३७ विद्यार्थ्यांनी परीक्षेची नोंदणी केली असून त्यामध्ये ८ लाख १० हजार ३४८ मुले, तर ६ लाख ९४ हजार ६५२ मुली आहेत. तर यंदा ३७ तृतीयपंथी नागरिकही परीक्षेसाठी बसले आहेत. दरम्यान, ११ फेब्रुवारी ते १८ मार्च २०१५ या कालावधीत ही परीक्षा होणार आहे. दुसरीकडे ही परीक्षा ‘कॉपीमुक्ती’ व्हावी या अनुषंगाने संबंधीत प्रशासनाकडून कडक अंमलबजावणी केल्याचा दावा करण्यात आला आहे. तर राज्यभरत २७१ भरारी पथकेही तैनात करण्यात आली आहे. (Maharashtra Education Board)
प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा



