छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील पिशोर खांडीत ऊसाचा ट्रक उलटून मोठा अपघात झाला आहे. या दुर्घटनेत १७ मजूर ट्रकखाली दबले असून, त्यापैकी चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. इतर मजुरांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ऊस भरलेल्या ट्रकवर १७ मजूर बसून प्रवास करत होते. पिशोरजवळ ट्रक अचानक उलटल्याने सर्व मजूर त्याखाली सापडले. अपघाताची माहिती मिळताच कन्नड शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

हे वाचलं का? – खंबाळा शिवारात घरफोडी; रोख रक्कम, दागिने लंपास

या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. जखमींवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले असून, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिस अधिक तपास करत आहेत.

तुमच्या भागातील प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here