
रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी (Late-Night Driving Risks) एक महत्त्वाचा अभ्यास समोर आला आहे. ‘रोड सायकॉलॉजी’ म्हणजेच महामार्गावरच्या मानवी वर्तनाचा अभ्यास, यामध्ये काही धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत. (Night Driving Safety)
प्रसिद्ध रोड सेफ्टी एक्स्पर्ट अभिजित वाघमारे (Abhijit Waghmare Research) यांनी केलेल्या अभ्यासानुसार, बहुतेक वाहनचालक रात्री ९ ते ११ या वेळेत महामार्गावरील हॉटेल, ढाबा, पेट्रोल पंप किंवा अज्ञात स्थळी जेवण करतात. मात्र, त्यानंतरच्या २-३ तासांमध्ये शरीरावर होणाऱ्या परिणामांची जाणीव अनेकांना नसते. (Highway Accidents)
जेवणानंतर शरीराची साखर पातळी (Blood Sugar) स्थिरावते, अन्न पचण्यास सुरुवात होते आणि शरीर झोपेच्या स्थितीत जायला लागते. यामुळे थकवा वाढतो, अलर्टनेस कमी होतो आणि झोप अनियंत्रित होते. या कारणांमुळे अपघात होण्याची शक्यता वाढते. (Road Psychology Study)
आकडेवारीनुसार डेथ अवर्समध्ये (Death Hours) म्हणजेच रात्री १ ते ३ या वेळेत फोर-व्हीलर अपघात सर्वाधिक होतात, तर ट्रक ड्रायव्हरचे अपघात ४ वाजल्यानंतर वाढतात, कारण ते रात्री उशिरा जेवण करतात.
‘डेथ अवर्स’ म्हणजे काय?
अभिजित वाघमारे यांच्या मते, महामार्गावर रात्रीच्या वेळी काही विशिष्ट तासांमध्ये अपघातांचे प्रमाण जास्त असते, यालाच ‘डेथ अवर्स’ असे म्हणता येईल.
अपघात टाळण्यासाठी उपाय (Accident Prevention)
- जेवणानंतर 2-3 तासांच्या आत आराम करावा.
- शरीरावर झोपेचा प्रभाव जाणवू लागल्यास लगेच ब्रेक घ्यावा.
- महामार्गावरच्या ‘अलर्ट अवर्स’ आणि ‘डेथ अवर्स’ याची जाणीव ठेवावी.
- गाडी चालवताना फक्त सीटबेल्ट पुरेसा नाही, तर मानसिक आणि शारीरिक तयारी महत्त्वाची आहे.
अभिजित वाघमारे यांच्या मते, रात्रीच्या महामार्ग सुरक्षेचा हा अभ्यास अपघातांचे प्रमाण ६० टक्क्यांपर्यंत पर्यंत कमी करू शकतो. मात्र, हे निष्कर्ष फक्त कागदावर न राहता वाहनचालकांनी त्यांचा प्रत्यक्ष प्रवासात अमल करणे गरजेचे आहे. रस्त्यावरचा हा ‘अनुभवसिद्ध अभ्यास’ अनेकांसाठी नवा असला, तरी तो लक्षात घेतल्यास अनेकांचे प्राण वाचू शकतात. (Road Safety Awareness)


