
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपमानजनक वक्तव्य केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या प्रशांत कोरटकर याच्यावर कोल्हापूर जिल्हा (Kolhapur Court) न्यायालयात हल्ला झाला आहे. (Attack on Prashant Koratkar)
कोरटकरची पोलिस कोठडी संपल्याने त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. या वेळी एका वकिलाने त्याच्यावर हल्ला चढवला. हल्लेखोर वकील अमित भोसले यांना पोलिसांनी ताबडतोब ताब्यात घेतले आहे. या घटनेने कोल्हापूरात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. (Prashant Koratkar assault)
प्रशांत कोरटकरला आज सकाळी कोल्हापूरच्या जिल्हा सत्र न्यायालयात आणण्यात आले. त्याची तीन दिवसांची पोलिस कोठडी संपली होती. सुनावणीसाठी तो कोर्टात हजर होता, तेव्हा अचानक वकील अमित भोसले यांनी त्याच्यावर हल्ला केला. (Kolhapur news) प्रत्यक्षदर्शींनुसार, भोसले यांनी कोरटकरवर हात उगारला आणि त्याला मारहाण करण्याचा प्रयत्न केला. कोर्टात उपस्थित असलेल्या पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत भोसले यांना रोखले आणि त्यांना ताब्यात घेतले. (Kolhapur district court incident)
हे वाचलं का? – नाशिकमध्ये रंगपंचमीच्या दिवशीच रक्तरंजित थरार, दोन सख्ख्या भावांची घराच्या अंगणात निर्घृण हत्या
प्रशांत कोरटकर हा मूळचा नागपुरातील आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याचा त्याच्यावर आरोप आहे. या प्रकरणामुळे राज्यभर संतापाची लाट उसळली होती. कोल्हापूर पोलिसांनी त्याला सोमवारी, २४ मार्च रोजी तेलंगणातून अटक केली. त्यानंतर मंगळवारी त्याला कोल्हापूरात आणून न्यायालयात हजर करण्यात आले होते. कोर्टाने त्याला २८ मार्चपर्यंत तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती.
अमित भोसले हे कोल्हापूरमधील वकील आहेत. कोरटकरने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यांमुळे ते संतापले होते, अशी प्राथमिक माहिती आहे. कोर्टात कोरटकरला पाहताच त्यांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी हल्ला चढवला. या घटनेनंतर कोर्ट परिसरात तणाव निर्माण झाला. भोसले यांचा हा कृत्य वैयक्तिक संतापातून घडल्याचे मानले जात आहे, परंतु याबाबत अधिक तपास सुरू आहे.
हल्ल्याची घटना घडताच कोर्टात उपस्थित पोलिसांनी त्वरित कारवाई केली. अमित भोसले यांना ताब्यात घेऊन त्यांना कोर्टाबाहेर नेण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणाची नोंद घेतली असून, भोसले यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे. कोल्हापूर पोलिसांनी कोर्ट परिसरातील सुरक्षाही वाढवली आहे, जेणेकरून पुढील अनुचित प्रकार टाळता येतील.
हे वाचलं का? – भांडण झालं म्हणून बायको माहेरी आली; नवऱ्यानं थेट सिनेस्टाईल केलं अन्…, घटनेचा थरार CCTV त कैद
प्रशांत कोरटकर याच्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याचा गंभीर आरोप आहे. त्याने इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना फोनवरून धमकी दिल्याची तक्रारही नोंदवली गेली होती. या प्रकरणात कोल्हापूरच्या जुन्या राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. कोरटकर गेल्या महिनाभरापासून फरार होता. अटक टाळण्यासाठी त्याने कोल्हापूर सत्र न्यायालयात आणि मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता, पण दोन्ही ठिकाणी त्याला दिलासा मिळाला नाही.
कोल्हापूर पोलिसांनी कोरटकरचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार केली होती. अखेर सोमवारी दुपारी तेलंगणातून त्याला बेड्या ठोकण्यात आल्या. रात्रभर १२ तासांचा प्रवास करून पोलिसांनी त्याला मंगळवारी सकाळी कोल्हापूरात आणले. त्यानंतर त्याला वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले आणि दुपारी जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. कोर्टाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती, जी आज संपली.
हे वाचलं का? – संतापजनक! सहा वर्षीय चिमुरडीचा विनयभंग, पैशांचे आमिष दाखवून नराधमाने केलं राक्षसी कृत्य
कोरटकरच्या अटकेनंतर कोल्हापूरात शिवप्रेमी आक्रमक झाले होते. मंगळवारी कोर्टात सुनावणीवेळी शेकडो शिवप्रेमींनी कोर्ट परिसरात गर्दी केली होती. काहींनी हातात कोल्हापुरी चप्पल घेऊन कोरटकरला हिसका दाखवण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी त्यांना रोखले, पण या घटनेने कोरटकर प्रकरण किती संवेदनशील आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. आजच्या हल्ल्यानेही हा संताप पुन्हा उफाळून आल्याचे दिसते.
तुमच्या भागातील प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा


