अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, दुचाकीचा चुराडा

वैजापूर । दिपक बरकसे

वैजापूर तालुक्यातील शिवगाव पाटी परिसरात भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला. काळू रामू जाधव (वय २८, रा. करोडी) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाचे नाव आहे. या प्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा अपघात इतका भयानक होता की, दुचाकीचा चुराडा झाला. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. (Hit-and-run accident)

मिळालेल्या माहितीनुसार, मयत काळू जाधव हे सोमवारी सायंकाळी आपल्या दुचाकीवरून (MH 21 BR 5296) शिऊर बंगल्याकडून करोडी गावाकडे निघाले होता. शिवगाव पाटीजवळ पोहोचताच एका अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला समोरून जोरात ठोकरले. या धडकेमुळे काळू रस्त्यावर लांब फेकले गेले आणि त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. अपघाताची तीव्रता इतकी होती की, दुचाकीचेही मोठे नुकसान झाले.

हे वाचलं का? –  रात्रीच्या प्रवासातील ‘डेथ अवर्स’! अभ्यासातून धक्कादायक माहिती समोर

अपघाताची माहिती मिळताच शिऊर पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक वैभव रणखांब, पोलीस नाईक गणेश गोरक्ष आणि संभाजी आंधळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तातडीने परिस्थितीचा आढावा घेतला आणि पंचनामा केला. स्थानिक लोकांनीही घटनास्थळी गर्दी करत पोलिसांना मदत केली. पोलिसांनी अपघाताची पाहणी करून मृतदेह पुढील तपासणीसाठी तात्काळ छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात पाठवला. (Vaijapur accident)

या अपघातातील अज्ञात वाहन आणि त्याचा चालक यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. अपघातानंतर चालक वाहनासह घटनास्थळावरून पळून गेला. पोलिसांनी आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून, प्रत्यक्षदर्शींची माहितीही गोळा केली जात आहे. सायंकाळी उशिरापर्यंत शिऊर पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. (road safety issues Vaijapur)

हे वाचलं का? – वाहनचालकांनो सावधान! ‘ब्लाइंड मर्जर ऍक्सिडेंट’ टाळण्यासाठी ‘हे’ नियम पाळाच

हा अपघात पुन्हा एकदा रस्ते सुरक्षेचा गंभीर प्रश्न उपस्थित करतो. वैजापूर तालुक्यातील अनेक रस्त्यांवर वाहनांची गती आणि अंधार यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे. शिवगाव पाटी परिसरात रस्त्याची स्थिती आणि प्रकाशाची कमतरता याबाबत स्थानिकांनी यापूर्वीही तक्रारी केल्या होत्या. या अपघाताने प्रशासनाचे लक्ष या समस्येकडे वेधले आहे.

या घटनेमुळे परिसरातील रस्त्यांवरील सुरक्षिततेबाबत चर्चा सुरू झाली आहे. स्थानिकांनी रस्त्यावर स्ट्रीट लाइट्स आणि स्पीड ब्रेकर्सची मागणी केली आहे. गेल्या काही महिन्यांत वैजापूर तालुक्यात अशा अनेक घटना घडल्या असून प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.

तुमच्या भागातील प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here