
महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभाग यांच्या मार्फत नगर परिषद अंतर्गत कार्यरत असणारे कर्मचारी व अधिकारी यांच्या मानसिक व शारीरिक विकासासाठी मराठवाडा विभागातील नगर परिषद कर्मचारी व अधिकारी यांची विभागीय क्रीडा स्पर्धा छत्रपती संभाजीनगर येथे दिनांक 19 व 20 जानेवारी 2025 रोजी विभागीय क्रीडा संकुल छत्रपती संभाजी नगर येथे घेण्यात आली होती.
विभागीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी नेत्र दीपक कामगिरी करून स्पर्धेत यश संपादन केले. जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत नगर परिषद वैजापूरच्या कर्मचाऱ्यांनी 18 गोल्ड व 31 सिल्वर पारितोषिक प्राप्त केले तसेच विभागीय स्तरावर 7 गोल्ड व 2 सिल्वर पारितोषिके पटकाविली.
हे वाचलं का? – कांदा उत्पादकांवर नवे संकट! बांगलादेशकडून आयातीवर दहा टक्के शुल्क
- 100 मीटर आणि 400 मीटर रिले (महिला) : सुनीता मगन वसावे, वैशाली नामदेव पगारे, तारा वसंतराव घोलप
- 400 मीटर रिले (पुरुष) : विजय गंगाधर हलकं, सुभाष इंदलसिंग गोमलाडू
- 100 मीटर रिले (पुरुष) : विजय गंगाधर हलकं
- टेबल टेनिस : एकेरीत किशोर रामभाऊ साळुंकर आणि दुहेरीत अक्षय राजबंगी व किशोर रामभाऊ साळुंकर
- कॅरम (महिला) : रोहिणी सुभाषराव देशमुख
- महिला उंच उडी व थाळीफेक: सुनीता मगन वसावे
- समूह गायन (द्वितीय क्रमांक) : राजे देवीसिंग वसावे, प्रमोद हरिश्चंद्र वैद्य, जगदीश चंद्रकांत पाटील, किशोर रामभाऊ साळुंकर
- क्रिकेट (मॅन ऑफ द मॅच) : अक्षय शिंदे
- महिलांच्या संगीत नृत्याला तिसरा क्रमांक देण्यात आला.
विभागीय स्तरावर स्त्री शिक्षणातून कशी प्रगती होते याबाबत मुख्याधिकारी डॉ. संगीताताई नांदुरकर व त्यांच्या सहकारी महिला शिक्षक व महिला कर्मचाऱ्यांनी प्रबोधन पर नृत्य सादर केले त्याचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी स्तुती केली. नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या क्रीडा व सांस्कृतिक सहभागास प्रोत्साहन देण्याचे काम नगर परिषदेच्या मुख्याधिकारी डॉ. संगीता ताई नांदुरकर यांनी केले.
हे वाचलं का? – शेतकरी कापूस, सोयाबीनच्या अनुदानाला मुकणार?
मुख्याधिकारी डॉक्टर संगीताताई नांदुरकर यांनी वैजापूर जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा आयोजन केले त्यामुळे महिला खेळाडूंना संधी मिळाली असे मत जिल्ह्यातील सर्वच खेळाडूंनी व्यक्त केले. मुख्याधिकारी डॉ. संगीताताई नांदुरकर, मनीष गणवीर भंडारपाल, वाल्मीक शेटे पाटील, साठे यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला व बक्षीस मिळवली. नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी मिळविलेल्या अभूतपूर्व यशाबद्दल आमदार रमेश पाटील बोरणारे सर व माजी नगराध्यक्ष दिनेश परदेशी व शिल्पा बाई परदेशी सह संपूर्ण शहरातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
तुमच्या भागातील प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा



