
वैजापूर । दिपक बरकसे
भारतीय जनता पक्षाच्या संघटन पर्व अंतर्गत संपूर्ण राज्यभर राबविण्यात येत असलेल्या प्राथमिक सदस्यता नोंदणी अभियानात वैजापूर शहरातील विनोद कैलाससिंग राजपूत यांनी उल्लेखनीय योगदान दिले आहे. त्यांनी एक हजार वैयक्तिक सदस्यांची नोंदणी पूर्ण करून पक्षसंघटनेस बळकटी दिली आहे.
या यशाबद्दल भाजप प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी राजपूत यांचे अभिनंदन केले आहे. ९ मार्च रोजी या दोन्ही वरिष्ठ नेत्यांनी अभिनंदनपर पत्र पाठवून त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. त्यांनी देशाच्या पुनर्निर्माणाच्या प्रवासात आणि भाजप कुटुंबात एक हजार नव्या सदस्यांना सामील करून घेतल्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले.
हे वाचलं का? – उपविभागीय कार्यालयाच्या दारातच तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न; वैजापूरातील धक्कादायक घटना
पत्रात महसूलमंत्री बावनकुळे यांनी नमूद केले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची प्रतिष्ठा जागतिक स्तरावर वाढली आहे, तर राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली प्रगतीचा वेग कायम आहे. भाजपच्या अंत्योदय धोरणामुळे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पक्षाचे विचार पोहोचत आहेत. विनोद राजपूत यांच्या सदस्यता नोंदणीतील योगदानामुळे पक्ष संघटनेस बळ मिळाले असून, त्यांच्या या समर्पित कार्याबद्दल पक्षाला अभिमान वाटतो, असेही बावनकुळे यांनी पत्रात म्हटले आहे.
तुमच्या भागातील प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा


