
राहुरी तालुक्यातील ताहराबाद येथे एका विवाहित तरुणाने पत्नी आणि तिच्या प्रियकराच्या त्रासाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
आत्महत्येपूर्वी मृत तरुणाने आपल्यावर झालेल्या अन्यायाचे वर्णन एका चिठ्ठीत आणि मोबाईल रेकॉर्डिंगद्वारे नोंदवले होते. या प्रकरणात पोलिसांनी मृताची पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे.
शनिवार, २८ डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता राहत्या घरी गळफास घेऊन तरुणाने आपले जीवन संपवले. मृत तरुणाने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत आणि मोबाईलवर केलेल्या रेकॉर्डिंगमध्ये पत्नी व शेजारील रवी एकनाथ गांगड या तरुणास जबाबदार धरले होते.
हे वाचलं का? – अपात्र बहिणींचे ‘लाड’ संपणार! ‘हे’ निकष पाळले नाहीत तर ७५०० रुपये परत घेणार
चिठ्ठी आणि रेकॉर्डिंगमध्ये आरोपींनी वारंवार धमक्या दिल्या, शिवीगाळ केली आणि मारहाण केल्याचे स्पष्ट झाले आहे. मृताच्या कुटुंबीयांनी राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिल्यानंतर मृताची पत्नी, तिचा प्रियकर रवी एकनाथ गांगड, व आणखी एक आरोपी सचिन गांगड यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ व त्यांच्या पथकाने आरोपींचा शोध घेतला. ताहराबाद परिसरातून सचिन गांगडला अटक करण्यात आली. मात्र, मुख्य आरोपी रवींद्र गांगड व मृताची पत्नी हे दोघे पसार झाले होते.
हे वाचलं का? – घसघशीत ‘रिटर्न्स’ मोहात लाखो गुंतवले, आता पश्चात्तापाची वेळ! आयुष्यभराची जमापुंजी गेली
पोलिसांनी अथक प्रयत्नांनंतर ५ जानेवारी रोजी रवींद्र गांगड याला ताब्यात घेतले. तर मयत रमेश उर्फ रामा गांगड याच्या दशक्रियाविधीच्या कार्यक्रमा ठिकाणी त्याची पत्नीला दशक्रिया विधीचा कार्यक्रम होताच ताब्यात घेऊन गजाआड केले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ करीत आहेत.
तुमच्या भागातील प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा



