Ram Shinde | Photo Credit - FB/Ram Shinde

नागपूर। Nagpur

राज्यात विधानसभा मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला असून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. दरम्यान विधान परिषद सभापतीच्या निवडीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.

गेल्या दोन वर्षांपासून विधानपरिषद सभापती पद रिक्त असल्याने या पदावर नेमकी कोणाची निवड होणार, याबाबत उत्सुकता लागून राहिली होती. विधान परिषदेच्या सभापतीपदासाठी महायुती तर्फे भाजपचे राम शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. उद्या ते अर्ज दाखल करणार आहेत. राम शिंदे यांनी स्वत: ट्विट करुन याबाबत माहिती दिली आहे.

“महाराष्ट्र विधान परिषद सभापती निवडणुकीसाठी माझी उमेदवारी घोषित केल्याबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, त्याचबरोबर देशाचे गृहमंत्री अमित शाह, भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, भारतीय जनता पार्टीचे राज्याचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, एनडीएचे आणि महायुतीचे आणि सर्व नेते यांचे मी मनापासून आभार मानतो. उद्या सकाळी विधान भवन नागपूर येथे १० वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे”, असं राम शिंदे यांनी म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here