
सावळीविहीर चौकात नगर मनमाड रोडवर कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेल्या पुलाच्या भरावानतर डांबरीकरणास मोठ्या प्रमाणावर तडे गेल्याने मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याने चौकशी होऊन संबधित ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शिवाजी पोपटराव कवडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या निवेदनात केली आहे.
हे वाचलं का? – चिमुकल्या पुतणीसाठी ९ महिन्यांची गर्भवती बिबट्याला भिडली! वैजापूरच्या आधुनिक हिरकणी पल्लवीताईंची गोष्ट
एका महिन्यात चौकशी होऊन कारवाई न झाल्यास वेळप्रसंगी शिडी येथे उपोषण करणार असल्याचा इशारा दिला आहे. सावळीविहिर येथील नगर मनमाड चौकात उभारलेल्या पुलाचा देखील समावेश आहे. एका बाजूने भराब पूर्ण करण्यात आला आहे. तर दुसरी बाजू अनुर्ण आहे जी एक बाजु पुर्ण केली त्या केलेल्या डांबरीकरणास केलेल्या भरावास मोठ्या प्रमाणावर तडे गेले आहेत. याची तात्काळ चौकशी करून त्याबाबत कठोर कारवाई व्हावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शिवाजी कवडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जिल्हा आधिकारी सिध्दाराम सालिमठ यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली.



