पतीने पत्नीवर कोयत्याने वार करत संपवलं | Photo Credit: Deepak Barkase, Canva, Edited

वैजापूर | दीपक बरकसे

घरगुती वादातून रागाच्या भरात पतीने पत्नीवर कोयत्याने वार करून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना वैजापूर (Vaijapur murder case) तालुक्यातील राहेगाव येथे घडली आहे. या प्रकरणी वैजापूर पोलिसांनी आरोपी पतीविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. मयत महिलेचे नाव अनिता चांगदेव शेलार (वय ५५, रा. राहेगाव) असे असून, आरोपी पती चांगदेव रामराव शेलार (वय ५८, रा. राहेगाव, व्यवसाय पोस्टमन) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ जून रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास अनिता शेलार यांना त्यांच्या नातेवाइकांनी वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात मृत अवस्थेत दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता, अनिता यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केल्याने अति रक्तस्त्राव होऊन त्यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. (Domestic violence Maharashtra) या घटनेची माहिती मिळताच वैजापूर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक प्रवीण पाटील आणि पोलिस हेड कॉन्स्टेबल किरण गोरे यांनी रुग्णालयात धाव घेतली. वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांनी मयताच्या प्रेताची पाहणी केली.

पोलिस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांच्या निर्देशानुसार पाटील आणि गोरे यांनी तपासाला सुरुवात केली. पोलिस पथकाने मयत अनिता यांच्या राहेगाव येथील घरी जाऊन पाहणी केली. घरातील समोरच्या खोलीत भिंतीवर रक्ताचे डाग, तसेच फरशी, गादी आणि उशी रक्ताने माखलेली आढळली. (Maharashtra crime news) यामुळे पोलिसांना संशय बळावला आणि त्यांनी तात्काळ चौकशी सुरू केली. (Husband kills wife Rahegaon)

हे वाचलं का? – हनीमूनचं रूपांतर हत्याकांडात! राजा रघुवंशी हत्या प्रकरणी ट्विस्ट, नव्या नवरीनेच दिली पतीची सुपारी

पोलिसांनी मयत अनिता यांच्या सुनेची चौकशी केली. तिने सांगितले की, १४ जून रोजी रात्री ११ ते ११:३० वाजण्याच्या सुमारास ती मुलांसह मधल्या खोलीत झोपली होती. तेव्हा तिला ओरडण्याचा आवाज ऐकू आला. समोरच्या खोलीत जाऊन पाहताच तिला सासरे चांगदेव शेलार यांच्या हातात रक्ताने माखलेला कोयता दिसला, तर सासू अनिता रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या होत्या. सासरे तिला पाहून तिथून पळून गेले. मात्र, सुनेची मानसिक अवस्था नाजूक असल्याने तिला अधिक माहिती देता आली नाही. (Woman killed by husband)

पोलिसांनी गावात चौकशी केली असता, गोपनीय सूत्रांकडून माहिती मिळाली की, चांगदेव शेलार यांचा पत्नी अनिता यांच्याशी घरगुती कारणावरून वाद झाला होता. रागाच्या भरात त्याने लोखंडी कोयत्याने पत्नीच्या गळ्यावर वार करून तिला गंभीर जखमी केले आणि नंतर तो राहेगाव येथून फरार झाला. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरु केला. (Vaijapur breaking news)

वैजापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रवीण पाटील, हेड कॉन्स्टेबल किरण गोरे, योगेश झाल्टे, रावसाहेब रावते आणि पोलिस शिपाई ज्ञानेश्वर मेटे यांच्या पथकाने कसोशीने तपास केला. त्यांनी फरार आरोपी चांगदेव शेलार याला शिऊर येथून अटक केली. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. (Headlines Marathi)

हे वाचलं का? – प्रेमसंबंध, हत्या अन् मृतदेह जाळले पण एका टॅटूमुळे…; पुण्यातील तिहेरी हत्याकांडाचं गूढ उकललं

या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक प्रवीण पाटील करीत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा खून घरगुती वादातून झाला असावा, असे प्राथमिक तपासात दिसून येत आहे. मात्र, वादाचे नेमके कारण आणि इतर परिस्थिती याबाबत पोलिस अधिक माहिती गोळा करीत आहेत. या घटनेमुळे राहेगाव परिसरात खळबळ उडाली असून, स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. (Husband kills wife)

घरगुती वादातून अशा प्रकारच्या हिंसक घटना घडणे हे सामाजिकदृष्ट्या चिंताजनक आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा बारकाईने तपास करून आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत. वैजापूर पोलिस याप्रकरणी सर्व पैलूंवर विचार करून तपास करीत असून, लवकरच याबाबत अधिक माहिती समोर येईल, अशी अपेक्षा आहे. (Headlines Marathi News)

ताज्या बातम्यांचे अपडेट्स थेट आपल्या फोनवर मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलला लगेच जॉइन करा! येथे क्लिक करा.

Get the latest Marathi newsMaharashtra news, and updates from politicselectionsportsentertainmenthealthagriculturebusiness, and religion – only on headlinesmarathi.com.

Vaijapur Murder Husband Kills Wife With Sickle Over Domestic Dispute in Rahegaon

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here