
अहिल्यानगर पोलिसांनी (Ahilyanagar Police) सोलापूर (Solapur) जिल्ह्यातून चालवल्या जाणाऱ्या बनावट नोटांच्या रॅकेटचा (Fake currency racket) पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तब्बल 68 लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या असून, तीन सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पप्पू उर्फ प्रतीक भारत पवार (वय 33, रा. सोलापूर), राजेंद्र कोंडीबा चौघुले (वय 42, रा. कर्जत, अहिल्यानगर) आणि तात्या विश्वनाथ हजारे (वय 40, रा. पाटेगाव, ता. कर्जत) अशी आहेत. या तिघांकडून बनावट नोटांसह नोटा तयार करण्यासाठी वापरली जाणारी यंत्रे आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. (Solapur fake notes)
राहुरीत सापळा, बनावट नोटा जप्त (Rahuri police operation)
शनिवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे आणि त्यांचे पथक राहुरी शहरात गस्त घालत होते. त्यांना गुप्त माहिती मिळाली होती की, तीन व्यक्ती मोटारसायकलवर बनावट नोटा घेऊन येत आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी नगर-मनमाड रोडवरील संत गाडगेबाबा विद्यालयासमोर सापळा रचला. तपासणीदरम्यान, तिघांच्या ताब्यातून एका बॉक्समध्ये बनावट नोटा आढळल्या. बँकेच्या व्यवस्थापकाला बोलावून नोटांची पडताळणी केली असता, त्या बनावट असल्याचे स्पष्ट झाले. (Police raid Tembhurni)
हे वाचलं का? – शाळेच्या आवारात रक्ताचा सडा! आठवीतल्या विद्यार्थ्याकडून दहावीतल्या विद्यार्थ्यावर चाकूने सपासप वार, जीवघेणा हल्ल्यात मुलाचा मृत्यू
जप्त करण्यात आलेल्या नोटांमध्ये 500 रुपयांच्या 75 बंडल्स (37 लाख 50 हजार रुपये) आणि 200 रुपयांच्या 44 बंडल्स (8 लाख 80 हजार रुपये) यांचा समावेश आहे. याशिवाय, 18 लाख रुपये किंमतीच्या प्रिंट केलेल्या कागदांचाही समावेश आहे. एकूण 70 लाख रुपयांचा मुद्देमाल या कारवाईत जप्त करण्यात आला. (Fake Indian currency)
टेंभुर्णीत छापा, बनावट नोटांचा कारखाना उघडकीस
आरोपींच्या चौकशीतून त्यांनी बनावट नोटा तयार करण्याचे ठिकाण सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी येथील शितरनगर असल्याचे समजले. पोलिसांनी तातडीने या ठिकाणी छापा टाकला. आरोपींनी हे घर भाड्याने घेतले होते. तिथून पोलिसांना झेरॉक्स मशीन, प्रिंटर, कटिंग मशीन, लॅमिनेशन मशीन, कंट्रोलर युनिट आणि नोटा बनवण्यासाठी लागणारा विशेष कागद जप्त केला. (Solapur crime news)
हे वाचलं का? – हादरवणारी घटना! आधी मुलीचा गळा आवळून खून केला, मग स्वत:ला संपवलं…; पोलीस बापानं एवढं टोकाचं पाऊल का उचललं?
आरोपींचा गुन्हेगारी इतिहास
अटक करण्यात आलेले तिन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असून, त्यांच्याविरुद्ध सोलापूरच्या कुर्डवाडी पोलीस ठाण्यात 2022 मध्ये गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात त्यांनी 22 महिने तुरुंगवास भोगला होता. तुरुंगातून सुटी झाल्यानंतर त्यांनी पुन्हा बनावट नोटांचा काळा धंदा सुरू केला होता. या रॅकेटद्वारे बनावट नोटा अहिल्यानगरसह इतर जिल्ह्यांमध्ये पुरवल्या जात असल्याचे तपासात उघड झाले आहे. (Headlines Marathi Crime News)
पोलिसांचा पुढील तपास
पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी सांगितले की, या रॅकेटचा पर्दाफाश करणे ही पोलिसांसाठी मोठी कामगिरी आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. बनावट नोटांचे रॅकेट आणखी किती पसरले आहे आणि त्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध घेतला जात आहे. (police raid fake currency)
Get the latest Marathi news, Maharashtra news, and updates from politics, election, sports, entertainment, health, agriculture, business, and religion – only on headlinesmarathi.com.


