विशाळगडवर अखेर बकरी ईदची कुर्बानी देण्यास परवानगी! | Vishalgad Fort | Photo Credit : Social Media, Canva, Edited

मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावर (Vishalgad Fort) बकरी ईदनिमित्त (Bakri Eid 2025) कुर्बानी देण्यास परवानगी दिली आहे. येत्या 7 आणि 8 जून 2025 रोजी नियम आणि अटींचे पालन करून सर्व भाविकांना कुर्बानी देण्याची मुभा देण्यात आली आहे. यामुळे विशाळगडावर येणाऱ्या भक्तांना मोठा दिलासा मिळाला आहे.

गेल्या वर्षी विशाळगडावर अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून वाद निर्माण झाला होता. 14 जुलै 2024 रोजी येथे दंगल उसळली होती, ज्यामुळे काही काळ पर्यटकांना गडावर प्रवेशबंदी घालण्यात आली होती. या घटनेनंतर कुर्बानी देण्यावरही निर्बंध लादले गेले होते. गेल्यावर्षीच्या उरूस दरम्यान फक्त स्थानिकांनाच कुर्बानीची परवानगी देण्यात आली होती. यामुळे यंदा बकरी ईदसाठी परवानगी मिळेल की नाही, याबाबत अनिश्चितता होती. (Qurbani permission)

विशाळगडावर बकरी ईद साजरी करण्यासाठी सर्व भाविकांना कुर्बानीची परवानगी मिळावी, यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने ही याचिका मंजूर करत सर्व भक्तांना नियमानुसार कुर्बानी देण्याची अनुमती दिली आहे. यामुळे यंदा स्थानिकांसह बाहेरून येणाऱ्या भाविकांनाही कुर्बानी करता येणार आहे. (Vishalgad Fort sacrifice permission)

हे वाचलं का? – साईबाबांच्या दरबारातच दानाची लूट! संस्थानाच्या कर्मचाऱ्याने मारला लाखो रुपयांवर डल्ला, सीसीटीव्हीने केला पर्दाफाश

दरम्यान, मिरा रोड (Mira Road controversy) येथील एका हायप्रोफाइल सोसायटीत बकरी ईदच्या कुर्बानीवरून तणाव निर्माण झाला आहे. बकरी ईदसाठी बकरी आणली असता काही रहिवाशांनी त्याला विरोध केला, ज्यामुळे वाद पेटला. गेल्या वर्षीही मिरा रोडमधील काही सोसायट्यांमध्ये असाच वाद झाला होता. यावर्षीही काही रहिवासी कुर्बानीला विरोध करत आहेत, ज्यामुळे परिसरात तणाव आहे.

राज्याचे मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी बकरी ईदच्या कुर्बानीला विरोध दर्शवला आहे. त्यांनी सोशल मीडियावर प्रश्न उपस्थित करत म्हटलं आहे की, जे लोक हिंदू सण पर्यावरणपूरक साजरे करण्याचा सल्ला देतात, ते बकरी ईद व्हर्च्युअली का साजरी करत नाहीत? त्यांच्या या वक्तव्यमुळेही चर्चांना उधाण आलं आहे. (Nitesh Rane Bakri Eid statement)

हे वाचलं का? –  शस्त्र परवान्यासाठी नको त्या थराला गेला; पोलिसांनी शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याला ठोकल्या बेड्या

विशाळगडावरील कुर्बानीला परवानगी मिळाल्याने भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. मात्र, मिरा रोडवरील वाद आणि नितेश राणे यांच्या वक्तव्यामुळे बकरी ईदच्या तयारीदरम्यान काही ठिकाणी तणाव कायम आहे. प्रशासनाने सर्वत्र शांतता राखण्यासाठी आवश्यक खबरदारी घेतली आहे. बकरी ईद शांततेत आणि नियमानुसार साजरी व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (Vishalgad Bakri Eid news)

ताज्या बातम्यांचे अपडेट्स थेट आपल्या फोनवर मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलला लगेच जॉइन करा! येथे क्लिक करा.

Get the latest Marathi newsMaharashtra news, and updates from politicselectionsportsentertainmenthealthagriculturebusiness, and religion – only on headlinesmarathi.com.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here