वैजापूरात अ‍ॅग्रीस्टॅक नोंदणीचा ढिसाळ कारभार, कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस | Representative image | Photo Credit : Canva, Edited

वैजापूर तालुक्यातील अ‍ॅग्रीस्टॅक शेतकरी नोंदणीचा आढावा (AgriStack scheme progress) या बैठकीदरम्यान समोर आले की, वैजापूर तालुक्यातील एकूण ९८,६९८ शेतकऱ्यांपैकी केवळ ६६,०१४ शेतकऱ्यांचीच अॅग्रीस्टॅकवर नोंदणी झाली आहे. उर्वरित ३२,६८४ शेतकऱ्यांची नोंदणी अद्याप बाकी आहे. या कामातील हलगर्जीपणामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आणि जबाबदार अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाईचा इशारा दिला. (AgriStack registration Maharashtra)

गावनिहाय अहवालाच्या तपासणीत काही गावांमध्ये अत्यल्प नोंदणी आढळल्याने संबंधित ग्राम महसूल अधिकारी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यांनी स्पष्ट आदेश दिले की, हे काम तातडीने पूर्ण करावे, अन्यथा संबंधित कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येईल. (Vaijapur farmer registration update)

त्यानुसार, २ जून २०२५ रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयात गट विकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी आणि तहसीलदार यांच्या उपस्थितीत संयुक्त आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत ५०% पेक्षा कमी नोंदणी असलेल्या गावांतील कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या. (show-cause notice government employees)

नोटीस प्राप्त झालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये तहसील कार्यालयातील ग्राम महसूल अधिकारी गजानन जाधव (वैजापूर), रतन गायकवाड (डवाळा), विक्रम वरपे (वांजरगाव), उर्मिला वानोळे (नालेगाव), माधुरी आहेर (भादली), आणि कल्पना गायसमुद्रे (करंजगाव) यांचा समावेश आहे. पंचायत समितीमधील ग्रामसेवकांमध्ये के. जे. काळे (अव्वलगाव), एन. बी. आडेपवार (वक्ती), एस. एम. ठवाळ (देवगाव शनि), एस. जे. राठोड (गोयगाव), एस. पी. रोडे (चेंडूफळ), आणि ए. पी. कचरे (भालगाव) यांना नोटीस बजावण्यात आली आहे.

याशिवाय, तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी सहाय्यक सुवर्णा भगवान राजपूत (लखमापूरवाडी), हेमलता देवराव मुठठे (टुणकी), पवन सुरेशराव वालमवाड (बाभुळखेडा), राधा राजेंद्र निकाळे (टेंभी), अविनाश सोपानराव पैठणकर (गोळवाडी), गणेश लक्ष्मण सोनटक्के (बिरोळा), आणि अर्चना तुकाराम सोनवणे (हनुमंतगाव) यांनाही नोटीस देण्यात आली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व संबंधित कर्मचाऱ्यांना नोंदणी प्रक्रिया त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यास मदत होईल. वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांची अॅग्रीस्टॅक नोंदणी पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलली असून, येत्या काही दिवसांत प्रगतीचा आढावा पुन्हा घेतला जाणार आहे.

ताज्या बातम्यांचे अपडेट्स थेट आपल्या फोनवर मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलला लगेच जॉइन करा! येथे क्लिक करा.

Get the latest Marathi newsMaharashtra news, and updates from politicselectionsportsentertainmenthealthagriculturebusiness, and religion – only on headlinesmarathi.com.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here