
पूर्व प्राथमिक अंगणवाडी शिक्षक भारतीचे पदाधिकाऱ्यांनी आज जिल्हा परिषद संभाजीनगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना सर आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुवर्णा जाधव यांची भेट घेतली.
या वेळी फेडरेशन आहारात बदल करण्याची गरज तसेच अंगणवाडी मोबाईल पोषण ट्रॅकर 22.6 व पोषण ट्रॅकर प्रशिक्षणाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या संदर्भातील निवेदन सादर करताच मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना सर यांनी निवेदनांवर सविस्तर मार्गदर्शन करत योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले.
हे वाचलं का? – स्की रिसॉर्टमध्ये अग्नितांडव! किमान ६६ जणांचा होरपळून अंत, जीव वाचवण्यासाठी अनेकांनी खिडक्यांमधून उड्या मारल्या
‘बेटी बचाव, बेटी पढाव’ योजनेला दहा वर्षे पूर्ण
जिल्हा परिषदेत आज ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ या योजनेच्या दहा वर्षांच्या यशस्वी कार्यकाळाचा उत्सव साजरा करण्यात आला. या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना सर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुवर्णा जाधव, जिल्हा परिषद अधिकारी व अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या. उपस्थित सर्वांनी ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ प्रतिज्ञा घेतली व त्यावर स्वाक्षऱ्या केल्या.
या वेळी प्राथमिक अंगणवाडी शिक्षक भारतीच्या जिल्हाध्यक्ष माया म्हस्के, जिल्हा कोषाध्यक्ष पल्लवी देशमुख, वैजापूर तालुकाध्यक्ष पुष्पा जाधव, संघटक अश्विनी सोनवणे (बरकसे), गीतांजली पहाडे आणि रंजना गाडेकर उपस्थित होत्या.
तुमच्या भागातील प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा



