
वैजापूर । Vaijapur
गेल्या १२ वर्षांपासून अखंडपणे मराठा सेवा संघ वैजापुरच्या वतीने राजमाता जिजाऊ रथ जयंतीच्या एक दिवस आधी सिंदखेडराजा येथील राजमाता जिजाऊ जन्मोत्सवात सहभागी होण्यासाठी प्रस्थान होतो.
याही वर्षी शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परीसरातून या राजमाता जिजाऊ रथाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते ठाकुर धोंडीरामसिंह राजपूत यांनी सकाळी सहा वाजेला भगवा ध्वज दाखवत रवाना केले. यावेळी आयोजक मोती वाघ, जिजाऊ ब्रिगेडच्या शोभा काळे, पालिकेचे स्वच्छता निरीक्षक प्रमोद निकाळे, दीपक साकला व या रथयात्रेत सहभागी होण्यासाठी आलेले बंधू -भगिनी उपस्थित होते.
तुमच्या भागातील प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी क्लीक करा



