भटाणा धरणातील अवैध पाणी उपसा थांबवण्यासाठी जलसमाधी आंदोलन

वैजापूर । दिपक बरकसे

वैजापूर तालुक्यातील भटाणा धरणातून खालच्या भागातील शेतकरी राजरोसपणे अवैधपणे पाणी उपसा करत असल्याने हा उपसा थांबवण्यासाठी शिऊर येथील ग्रामपंचायत सदस्य बाळा जाधव यांनी शनिवारी (दि. १८) रोजी भटाणा जलाशयात जलसमाधी आंदोलन केले.

सतत होणाऱ्या पाणी उपश्यामुळे मागील वर्षी धरणातील पाणीसाठा संपल्याने पाणी टंचाई निर्माण झाली होती. नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागले होते. धरणात बसवलेल्या अवैध मोटारी जप्त करुन त्यांना दंडित करण्यांत यावे व धरणातील पाणी पिण्यासाठी आरक्षित करावे ही मागणी घेऊन त्यांनी हे आंदोलन केले.

भरधाव पिकअपने शाळकरी मुलीला उडविले, मुलीचा जागीच मृत्यू… घटना CCTV मध्ये कैद

याप्रसंगी महसूलचे पवार, जलसंपदा विभागचे जंजाळे व जिवन मेवाल, पोलिस स्टेशनचे विशाल पैठणकर, किशोर आघाडे उपस्थित होते. जाधव यांनी तिन तास धरणात बसुन आंदोलन केले. यावर आठ दिवसांत कडक कारवाई करण्यात येईल असे पाटबंधारे विभागाचे जंजाळ यांनी आश्वासन दिले. त्यामुळे हे आंदोलन मागे घेण्यात आले. या प्रसंगी समीर पठाण, जावेद शेख, अस्लम शेख, वाहेद सैय्यद, शकील शेख अदी कार्यकर्ते उपस्थित होते.

तुमच्या भागातील प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी क्लीक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here