
संतोष देशमुख हत्याप्रकरणामुळे अडचणीत सापडलेल्या धनंजय मुंडे यांना पहिला मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्रातील बहुप्रतिक्षित पालकमंत्री पदांची यादी जाहीर झाली आहे. या यादीत धनंजय मुंडे यांचे नाव कुठेच नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बीडचे पालकमंत्री करण्यात आले आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांचं राजकीय दोर कापले जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
बीड जिल्ह्याचं पालकमंत्री पद धनंजय मुंडे यांच्याकडे देण्यात येऊ नये, अशी मागणी बीडमधील सर्वपक्षीय आमदार आणि स्थानिक नेत्यांनी केली होती. याबरोबरच बीड जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदारांनी बीडचं पालकमंत्री पद देवेंद्र फडणवीस किंवा अजित पवार यांनी स्वत:कडे घ्यावं, अशी मागणी केली होती. यानंतर अखेर आता बीडचं पालकमंत्री पद अजित पवार यांच्याकडे देण्यात आलं आहे. बीड जिल्ह्याचं पालकमंत्रिपद अजित पवार यांच्याकडे देण्यात आल्यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांनी एक्सवर (ट्विटर) पोस्ट करत पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
हे वाचलं का? – महत्वाची बातमी! ‘या’ वाहनांना HSRP नंबरप्लेट बंधनकारक
धनंजय मुंडे काय म्हणाले?
“बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन व खूप खूप स्वागत. आदरणीय दादांच्या नेतृत्वात बीड जिल्ह्याच्या विकासाला पुणे जिल्ह्याप्रमाणे अधिकची गती आणि चालना मिळेल असा मला विश्वास आहे. बीड जिल्ह्यातील सध्या बदललेली राजकीय व सामाजिक स्थिती पाहता मुख्यमंत्री महोदय व उपमुख्यमंत्री महोदय यांना मी स्वतः बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद अजित पवार यांना स्वीकारण्याबाबत विनंती केली होती. त्यानुसार त्यांनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्वीकारले, याचा मला आनंद वाटतो. सद्यस्थितीत मला कोणत्याच जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी नको, अशी माझी विनंतीही मान्य केल्याबद्दल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांचे आभार! मला दिलेल्या विभागाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील, अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी ट्वीट करत दिली आहे.
पालकमंत्रिपदाची यादी पुढीलप्रमाणे
१. गडचिरोली – देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस, मुख्यमंत्री
२. ठाणे – एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे, उप. मुख्यमंत्री
३. मुंबई शहर- एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे,
४. पुणे -अजित आशाताई अनंतराव पवार, उप. मुख्यमंत्री
५. बीड – अजित आशाताई अनंतराव पवार, उप मुख्यमंत्री
६. नागपूर- चंद्रशेखर प्रभावती कृष्णराव बावनकुळे
७. अमरावती- चंद्रशेखर प्रभावती कृष्णराव बावनकुळे
८.- अहिल्यानगर – राधाकृष्ण सिंधुताई एकनाथराव विखे-पाटील
९. वाशिम- हसन सकिना मियालाल मुश्रीफ
१०. सांगली- चंद्रकांत (दादा) सरस्वती बच्चू पाटील
११. नाशिक- गिरीश गीता दत्तात्रय महाजन
१२. पालघर- गणेश सुभद्रा रामचंद्र नाईक
१३. जळगांव – गुलाबराव रेवाबाई रघुनाथ पाटील
१४. यवतमाळ – संजय प्रमिला दुलिचंद राठोड
१५. मुंबई उपनगर – अॅड. आशिष मिनल बाबाजी शेलार, मंगलप्रभात प्रेमकंवर गुमनमल लोढा (सह-पालकमंत्री)
१६. रत्नागिरी- उदय स्वरुपा रविंद्र सामंत
१७. धुळे -जयकुमार नयनकुवर जितेंद्रसिंह रावल
१८ जालना- पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे
१९. नांदेड – अतुल लिलावती मोरेश्वर सावे
२०. चंद्रपूर – डॉ. अशोक जनाबाई रामाजी उईके
२१. सातारा- शंभूराज विजयादेवी शिवाजीराव देसाई
२२. रायगड – कु. आदिती वरदा सुनिल तटकरे
२३. लातूर- शिवेंद्रसिंह अरुणाराजे अभयसिंहराजे भोसले
२४. नंदूरबार- अॅड. माणिकराव सरस्वती शिवाजी कोकाटे
२५. सोलापूर -जयकुमार कमल भगवानराव गोरे
२६. हिंगोली – नरहरी सावित्रीबाई सीताराम झिरवाळ
२७. भंडारा- संजय सुशीला वामन सावकारे
२८. छत्रपती संभाजीनगर – संजय शंकुतला पांडुरंग शिरसाट
२९. धाराशिव – प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक
३०. बुलढाणा – मकरंद सुमन लक्ष्मणराव जाधव (पाटील)
३१. सिंधुदुर्ग- नितेश निलम नारायण राणे
३२. अकोला- आकाश सुनिता पांडुरंग फुंडकर
३३. गोंदिया -बाबासाहेब शांताबाई मोहनराव पाटील
तुमच्या भागातील प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी क्लीक करा


