देवदर्शनाला जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला! भीषण अपघातात ८ महिलांचा मृत्यू अन्..

श्रावण महिन्याच्या तिसरा सोमवार असल्याने भाविक शिव मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी करत आहेत. अशातच पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात भाविकांवर काळाने घाला घातल्याची ह्रदयद्रावक घटना घडली असून भीषण अपघातात ८ महिलांचा मृ्त्यू झाला आहे. (Pune Khed Taluka accident)

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी उशिरा रात्री १.१५ वाजताच्या सुमारास २५ ते ३० भाविक, ज्यात महिला व लहान मुलेही होती, पिकअप वाहनातून कुंडेश्वर मंदिराच्या (Kundeshwar Temple) दिशेने जात होते. नागमोडी वळणांनी भरलेल्या डोंगराळ रस्त्यावर, अचानक वाहनाने नियंत्रण सुटून रिव्हर्स घेतली आणि ५ ते ६ वेळा पलटी घेत थेट दरीत कोसळले. या भीषण अपघातात घटनास्थळीच ८ महिलांचा मृत्यू झाला, तर २० पेक्षा अधिक भाविक गंभीर जखमी झाले आहेत. (Pilgrims road accident Maharashtra)

अपघातात मृत्यू झालेल्या महिलांची नावे पुढीलप्रमाणे

१) शोभा ज्ञानेश्वर पापड
२) सुमन काळूराम पापड
३) शारदा रामदास चोरगे
४) मंदा कानिफ दरेकर
५) संजीवनी कैलास दरेकर
६) मिराबाई संभाजी चोरगे
७) बायडाबाई न्यानेश्वर दरेकर
८) शकुंतला तानाजी चोरघे

अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. मात्र, प्रशासनाकडून रुग्णवाहिका वेळेवर न पोहोचल्यामुळे काही भाविकांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी रुग्णालयात धाव घेऊन जखमींची विचारपूस केली आणि उपचार व्यवस्थेचा आढावा घेतला. जखमींना पाईट, खेड, चाकण आणि भोसरी येथील विविध रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे. यात काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. (Pune devotees killed accident)

कुंडेश्वर मंदिर हे खेड तालुक्यातील एक प्रमुख धार्मिक स्थळ असून, श्रावण महिन्यात येथे भाविकांची मोठी गर्दी असते. दरवर्षी भाविक डोंगर चढून मंदिराचे दर्शन घेतात. आजचा दिवसही त्याला अपवाद नव्हता, मात्र श्रद्धेच्या प्रवासात घडलेल्या या अपघाताने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अपघातानंतर स्थानिकांनी रुग्णवाहिका व आपत्कालीन सेवेच्या विलंबाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. डोंगराळ व अरुंद रस्त्यांवर वाहतूक सुरक्षिततेबाबत ठोस पावले उचलण्याची मागणी होत आहे. (Headlines Marathi News)

श्रावण सोमवारच्या दिवशी घडलेला हा अपघात केवळ 8 कुटुंबांवरच नव्हे, तर संपूर्ण गावावर दु:खाचा डोंगर कोसळून गेला आहे. श्रद्धा आणि आनंदाचा दिवस शोक आणि अश्रूंनी भरून गेला. प्रशासनाने या घटनेतून धडा घेत, भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. (Road safety in hilly areas)

ताज्या बातम्यांचे अपडेट्स थेट आपल्या फोनवर मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलला लगेच जॉइन करा! येथे क्लिक करा.

Get the latest Marathi newsMaharashtra news, and updates from politicselectionsportsentertainmenthealthagriculturebusiness, and religion – only on headlinesmarathi.com.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here