श्रावण बाळ योजना, संजय गांधी निराधार योजना अंतर्गत प्रलंबित ३००० प्रस्ताव मंजूर करा; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी

वैजापूर । दीपक बरकसे

वैजापूर तालुक्यातील श्रावण बाळ योजना व संजय गांधी निराधार योजना अंतर्गत अनेक वयोवृद्ध, अपंग, निराधार, परितक्ता, तसेच विधवा लाभार्थ्यांचे काही महिन्यांपासून प्रलंबित असलेले ३००० प्रस्ताव मार्गी लावा अशी मागणी उपुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष विशाल शेळके यांनी केली. प्रलंबित प्रकरणे कलेक्टरला बोलून मार्गी लावू असे आश्वासन पवार यांना शिष्टमंडळास दिले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सदर लाभार्थ्यांमध्ये अनेक जण अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत आपले जीवन जगत असून, त्यांना शासनाच्या या योजनांअंतर्गत नियमित आर्थिक सहाय्य मिळणे अत्यावश्यक आहे. प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. जे प्रस्ताव नियमात बसत आहे, असे प्रस्तावास मंजूर करणे आवश्यक आहे. या संदर्भात उपविभागीय अधिकारी, वैजापूर यांना भेटून दिनांक 28/04/2025 रोजी भेटून निवेदन ही दिले होते. परंतु अजुन पर्यंत कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. यासाठी लाभार्थ्यांना न्याय मिळाला म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी च्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे.

सदरील सबंधित लाभार्थ्यांचे 3000 प्रकरणे तातडीने मंजूर व्हावे म्हणून मा. तहसीलदार, वैजापूर यांना सूचना देण्यात यावी, जेणेकरून लाभार्थ्यांना न्याय मिळेल व शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनांचा हेतू सफल होईल. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळात माजी सभापती एल एम पवार, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर बागुल, जिल्हा उपाध्यक्ष शैलेश सुराशे, जिल्हा सरचिटणीस गणेश पवार आदी उपस्थित होते.

ताज्या बातम्यांचे अपडेट्स थेट आपल्या फोनवर मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलला लगेच जॉइन करा! येथे क्लिक करा.

Get the latest Marathi newsMaharashtra news, and updates from politicselectionsportsentertainmenthealthagriculturebusiness, and religion – only on headlinesmarathi.com.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here