प्रसिद्ध धार्मिक स्थळ शिर्डी येथील एका हॉटेलमधून ३ कोटी २६ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोकड चोरीला गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गुजरातमधील सोन्याचे व्यापारी विजयसिंह वसनाजी खिशी (वय ३५, रा. आवाल घुमटी, गुजरात) यांच्या तक्रारीवरून शिर्डी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. विशेष म्हणजे, खिशी यांनी त्यांच्या चालकावरच चोरीचा संशय व्यक्त केला आहे. (Shirdi gold theft)

खिशी हे मुंबईतील त्यांच्या होलसेल सोन्याच्या फर्ममधून जवळपास ४ किलो ८७३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने घेऊन ७ मे रोजी शिर्डीत आले होते. त्यांच्या सोबत कामगार चंद्रप्रकाश प्रजापती आणि चालक सुरेश कुमार भुरसिंह राजपुरोहीत (रा. चौहटन, राजस्थान) देखील होते. शिर्डीतील हॉटेल साई सुनीता येथील रूम क्रमांक २०१ मध्ये ते तिघे मुक्कामी होते. (driver steals gold Shirdi)

हे वाचलं का? – कसं फत्ते झालं ‘ऑपरेशन सिंदूर’? २३ मिनिटांत पाकिस्तानच्या चिंधड्या उडवणारे ‘ते’ ९ व्हिडिओ समोर

विजयसिंह खिशी हे जिल्ह्यातील विविध सोनार दुकानदारांना भेटून सोने विक्री करत होते. दररोज विक्री झाल्यावर ते रात्री हॉटेलमध्ये परतत होते. १३ मे रोजी रात्री ११ वाजता त्यांनी जेवण करून हॉटेलच्या खोलीत झोप घेतली. सोन्याच्या दागिन्यांची बॅग त्यांनी बेड आणि टेबलच्या मध्ये ठेवली होती. खोली आतून लॉक केली होती. (Shirdi hotel theft)

१४ मे रोजी सकाळी ६ वाजता खिशी यांचा चुलत भाऊ शैलेंद्रसिंह पेमेंट घेण्यासाठी हॉटेलवर पोहोचला. त्याने दरवाजा उघडला असता तो आधीच उघडा होता. खोलीत पाहता चालक सुरेश कुमार गायब होता. मात्र त्याचा मोबाईल फोन आणि कपडे खोलीतच होते. हॉटेल तसेच मंदिर परिसरात शोध घेतला, मात्र तो कुठेही सापडला नाही. (gold trader robbery Maharashtra)

खिशी यांनी तात्काळ सोन्याच्या बॅगेची तपासणी केली. त्यात सुमारे ३.५ किलो वजनाचे, अंदाजे ३ कोटी २२ लाख रुपये किंमतीचे विविध सोन्याचे दागिने आणि ४ लाख रुपयांची रोकड गायब असल्याचे आढळून आले. त्यामुळे एकूण ३ कोटी २६ लाख रुपयांची चोरी झाल्याचे स्पष्ट झाले. (Shirdi crime news)

हे वाचलं का? – शहीद किरण शेखावत यांच्याबाबतची पोस्ट पुन्हा व्हायरल, पण सत्य वेगळंच आहे!

खिशी यांच्या म्हणण्यानुसार, चालक सुरेश कुमार केवळ दोन महिन्यांपूर्वीच कामावर आला होता. त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला होता, परंतु त्याने विश्वासघात केला असा आरोप खिशी यांनी केला आहे. याप्रकरणी पोलिस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलिस अधीक्षक वैभव कलबुर्मे, पोलीस उपाधीक्षक शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करत आहेत. (driver escapes with gold)

शिर्डी पोलीस ठाण्याचे निरीक्षक रणजित गलांडे यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक निवांत जाधव यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी तपास करत असून, आरोपीचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. (Shirdi police investigation)

ताज्या बातम्यांचे अपडेट्स थेट आपल्या फोनवर मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलला लगेच जॉइन करा! येथे क्लिक करा.

Get the latest Marathi newsMaharashtra news, and updates from politicselectionsportsentertainmenthealthagriculturebusiness, and religion – only on headlinesmarathi.com.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here