भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धबंदीचा निर्णय जाहीर झाल्यानंतरही दोन्ही देशांतील तणाव अद्याप पूर्णपणे निवळलेला नाही. या पार्श्वभूमीवर भारताने अलीकडेच यशस्वीरित्या पार पाडलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे (Operation Sindoor) पाकिस्तान पुरता हादरला आहे. भारतावर विविध पद्धतीने हल्ल्याचे प्रयत्न करूनही पाकला अपयशच पदरी पडलं. भारताच्या सक्षम हवाई संरक्षण यंत्रणेपुढे त्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले.
या दहशतवादविरोधी लढ्यात अनेक देशांनी भारताला पाठिंबा दिला असताना, काही देशांनी पाकिस्तानला उघड पाठिंबा दर्शविला आहे. विशेषतः तुर्कीने भारताविरोधात उघड भूमिका घेत पाकिस्तानच्या बाजूने (Turkey supports Pakistan) आपला पवित्रा मांडला आहे. यामुळे भारतात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या असून, व्यापारी व नागरिकांनी ‘बॉयकॉट तुर्की’ मोहिमेअंतर्गत तुर्कीमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्यास सुरुवात केली आहे. (India Turkey boycott)
पुण्यात तुर्कीच्या सफरचंदांवर बहिष्कार (boycott Turkish goods)
पुणे शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापाऱ्यांनी तुर्कीवरून आयात करण्यात येणाऱ्या सफरचंदांची विक्री थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. दरवर्षी पुण्यातील बाजारपेठेत तुर्कीच्या सफरचंदांचा 1000 ते 1200 कोटी रुपयांचा हिस्सा असतो. मात्र तुर्कीच्या पाकिस्तानला पाठिंब्यामुळे या सफरचंदांची मागणी प्रचंड घटली आहे. (Pune apple ban)
हे वाचलं का? – ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं! ९ दहशतवादी तळांवरील १०० हून अधिक दहशतवादी ठार, सैन्य दलाने केले स्पष्ट
पुण्यातील APMC मार्केटमधील व्यापाऱ्यांनी सांगितलं, “देशभक्तीच्या भावनेतून आणि भारत सरकारच्या निर्णयांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही तुर्कीमधून सफरचंद मागवणं थांबवलं आहे. त्याऐवजी हिमाचल, उत्तराखंड, इराण आणि अन्य देशांमधून सफरचंद मागवले जात आहेत.”
स्थानिक बाजारातही याचा स्पष्ट परिणाम दिसून येतो आहे. ग्राहकांनी तुर्कीच्या सफरचंदांचा उघड बहिष्कार घातला असून, मागणीमध्ये सुमारे ५० टक्क्यांची घट नोंदवली गेली आहे. परिणामी, विक्रेत्यांनी इराण, वॉशिंग्टन आणि न्यूझीलँडच्या सफरचंदांना प्राधान्य दिलं आहे. यामुळे या देशांच्या सफरचंदांच्या दरामध्ये प्रति पेटी 200 ते 300 रुपयांची वाढ झाल्याचंही समोर आलं आहे.
उदयपूरमधील व्यापाऱ्यांचा मोठा निर्णय (Udaipur marble import ban)
महाराष्ट्रापाठोपाठ आता राजस्थानातील उदयपूर येथील व्यापाऱ्यांनीही तुर्कीवर आर्थिक आघात करण्याचा निर्णय घेतला आहे. आशियातील सर्वात मोठ्या व्यापार केंद्रांपैकी एक असलेल्या उदयपूरमध्ये व्यापाऱ्यांनी तुर्कीवरून येणाऱ्या मार्बलच्या आयातीवर बंदी घातली आहे. (ndia Turkey relations)
उदयपूर मार्बल प्रोसेसर्स कमिटीचे अध्यक्ष कपिल सुराना यांनी यासंदर्भात स्पष्ट भूमिका घेतली आहे. ते म्हणाले, “जोपर्यंत तुर्की पाकिस्तानच्या बाजूने उभा राहतो, तोपर्यंत आम्ही त्यांच्याशी व्यापार करणार नाही.” भारतात आयात होणाऱ्या मार्बलपैकी जवळपास ७० टक्के हिस्सा तुर्कीवर आधारित असला, तरी देशहितासाठी हा मोठा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
हे वाचलं का? – शहीद किरण शेखावत यांच्याबाबतची पोस्ट पुन्हा व्हायरल, पण सत्य वेगळंच आहे!
सुराना पुढे म्हणाले, “फक्त उदयपूरच नव्हे, तर देशातील अन्य शहरांतील मार्बल असोसिएशन्सही तुर्कीशी व्यापार बंद करत आहेत. यामुळे तुर्कीला जागतिक स्तरावर एक स्पष्ट संदेश जाईल की भारतात सरकारसह जनता आणि उद्योगविश्वही एकवटले आहे.” (India responds to Turkey Pakistan support)
‘बॉयकॉट तुर्की’चे पडसाद संपूर्ण देशात
सध्या ‘बॉयकॉट तुर्की’ मोहिमेचे पडसाद देशभरात उमटताना दिसत आहेत. सोशल मीडियावर या मोहिमेला प्रचंड प्रतिसाद मिळत असून, नागरिक, व्यापारी आणि उद्योजक यांचा तुर्कीविरोधात आक्रमक पवित्रा दिसून येतो आहे. अनेक व्यापार संघटनांनी तुर्कीच्या वस्तूंवर बहिष्कार घालण्याचे ठरवले असून, आयातीच्या बदलासाठी पर्यायी देशांची निवड केली जात आहे.
भारताचे बळकट आर्थिक आणि संरक्षण धोरण हे केवळ सरकारपुरते मर्यादित न राहता नागरिकांपासून व्यापाऱ्यांपर्यंत पोहोचले आहे, हे या मोहिमेमुळे स्पष्ट झाले आहे. तुर्कीच्या वर्तणुकीचा निषेध करत व्यापाऱ्यांनी घेतलेले निर्णय देशाच्या सार्वभौमत्वासाठी उचललेलं पाऊल असल्याचे मानले जात आहे. भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्कीने घेतलेल्या पाकिस्तान समर्थक भूमिकेमुळे भारतात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. व्यापार क्षेत्रात याचा मोठा परिणाम दिसून येतो आहे. देशभरातील व्यापाऱ्यांनी तुर्कीविरोधात उघड भूमिका घेत, त्यांच्या उत्पादनांवर बहिष्कार टाकला आहे. पुण्यातील सफरचंद बाजार असो वा उदयपूरचा मार्बल व्यवसाय – सर्वत्र देशहित आणि आत्मनिर्भरतेची जाणीव दिसून येते.
हे वाचलं का? – कसं फत्ते झालं ‘ऑपरेशन सिंदूर’? २३ मिनिटांत पाकिस्तानच्या चिंधड्या उडवणारे ‘ते’ ९ व्हिडिओ समोर
सरकारच्या भूमिकेला पाठिंबा देणारी ही आर्थिक लढाई केवळ तुर्कीपुरती मर्यादित न राहता, भविष्यात इतर देशांसाठीही एक स्पष्ट इशारा ठरेल, हे नक्की. भारतातील जनता आता केवळ सीमारेषेवरच नव्हे, तर बाजारपेठेतूनही राष्ट्रहितासाठी लढण्यास सज्ज आहे.
Get the latest Marathi news, Maharashtra news, and updates from politics, election, sports, entertainment, health, agriculture, business, and religion – only on headlinesmarathi.com.


