
वैजापूर । दिपक बरकसे
दरोडा व मकोका गुन्ह्यात अटकेत असलेला २० वर्षीय आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला आहे. ही घटना वैजापूर न्यायालयाच्या आवारात आज (सोमवार) दुपारच्या सुमारास घडली.
धीरज भरम भोसले (२०वर्षे, रा. पडेगाव, कोपरगाव, अहिल्यानगर) असे पसार झालेल्या आरोपीचे नाव आहे. आज पोलिसांनी ९ आरोपींना वैजापूर सत्र न्यायालयात हजर केले होते. सत्र न्यायालयात हजेरीनंतर आरोपी गाडीत होते.
हे वाचलं का? – शेतीच्या बांधावरून वाद विकोपाला, मारहाणीत तरुणाचा जीव गेला
दुपारी ३.३० वाजता आरोपी धीरज भोसले हा हातकड्यांसह गाडीच्या मागील दरवाजातून पळून गेला. पोलिसांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र तो सापडू शकला नाही. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांची पथके आरोपीचा शोध घेत आहेत.
तुमच्या भागातील प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा


