
वैजापूर । दिपक बरकसे
नागपूर-मुंबई महामार्गावरील म्हस्की चौफुली येथे भरदुपारी एका महिलेला लक्ष्य करत चोरट्याने १४ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत लंपास केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी वैजापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (Vaijapur chain snatching)
ही घटना २६ जून रोजी दुपारी चार ते सव्वाचारच्या दरम्यान घडली. आशा रघुनाथ टूपके (वय ३८, रा. तळेगाव मळे, ता. कोपरगाव) या आपल्या काही कामासाठी वैजापूर शहरातील नागपूर-मुंबई महामार्गावरील म्हस्की चौफुली परिसरातून जात होत्या. याच दरम्यान, अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सुमारे १४ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत हिसकावून पळ काढला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे त्या क्षणात काहीच समजण्याच्या आधी चोरट्याने पलायन केले होते. (Woman robbed Nagpur Mumbai highway)
हे वाचलं का? – कोकण कड्यावर भयंकर घडलं! ४० वर्षीय तलाठ्याने तरुणीसह आयुष्य संपवलं; चिठ्ठीत बरचं काही लिहून ठेवलं, नेमकं काय घडलं?
त्यानंतर, २७ जून रोजी दुपारी सुमारास आशा टूपके यांनी वैजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरोधात चोरीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार सिंगल करत आहेत. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असून, आरोपीचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. (Daylight robbery Maharashtra)
या घटनेमुळे नागपूर-मुंबई महामार्गावरील वाहतूकदृष्ट्या महत्त्वाच्या भागांमध्ये सुरक्षा व्यवस्था आणि पोलिस गस्त प्रभावी आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. भरदिवसा, सार्वजनिक ठिकाणी घडणाऱ्या अशा चोरीच्या घटनांमुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वैजापूर पोलिसांनी नागरिकांना रस्त्यावरून प्रवास करताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. (Headlines Marathi)
हे वाचलं का? – धक्कादायक! पतीने कोयत्याने वार करत पत्नीला संपवलं; रूममधील भिंतीवर उडाल्या रक्ताच्या चिळकांड्या, नेमकं काय घडलं?
मौल्यवान दागिने घालून प्रवास करताना सतर्कता ठेवावी, शक्य असल्यास सुरक्षित वाहतूक साधनांचा वापर करावा, असे पोलिसांनी सांगितले आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा रस्त्यांवरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, स्थानिक प्रशासनाने अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी अधिक प्रभावी पावले उचलण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. (Marathi Crime News)
Get the latest Marathi news, Maharashtra news, and updates from politics, election, sports, entertainment, health, agriculture, business, and religion – only on headlinesmarathi.com.


