
वैजापूर | दीपक बरकसे
वैजापूर तालुक्यातील भायगाव ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक विजयकुमार पंडितराव क्षीरसागर (वय 53, रा. म्हाडा कॉलनी, शाहनुरवाडी, छत्रपती संभाजीनगर) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) बुधवारी रंगेहाथ पकडले. स्मशानभूमीच्या कामाचे उर्वरित बिल मंजूर करण्यासाठी उपसरपंचाकडून 10,000 रुपये लाच स्वीकारताना त्याला जरूळ फाटा येथील एका हॉटेलवर अटक करण्यात आली. (Vaijapur bribery case)
भायगाव ग्रामपंचायती अंतर्गत जनसुविधा योजनेत स्मशानभूमीच्या कामासाठी 6 लाख 96 हजार रुपयांचे बिल मंजूर झाले होते. या कामाचे ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) उपसरपंचाने ग्रामपंचायत कार्यालयात सादर केले. यापैकी 94,000 रुपयांचे उर्वरित बिल मंजूर करून चेकवर स्वाक्षरी करण्यासाठी क्षीरसागर याने प्रथम 15,000 रुपये लाच मागितली. तडजोडीअंती ही रक्कम 10,000 रुपये निश्चित झाली. (Gramsevak caught red-handed)
हे वाचलं का? – लाचखोरीचा कळस! शेतजमिनीच्या कामासाठी मागितले 41 लाख, उपजिल्हाधिकाऱ्यासह लिपीक ACB च्या जाळ्यात
लाच देण्यास नकार देणाऱ्या उपसरपंचाने 17 जून रोजी छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली. तक्रारीनंतर विभागाने शासकीय पंचांसह लाचेची पडताळणी केली. यावेळी क्षीरसागर याने लाचेची मागणी केल्याचे उघड झाले. त्यानुसार, बुधवारी सकाळी जरूळ फाटा येथील हॉटेलवर सापळा रचण्यात आला. क्षीरसागर 10,000 रुपये स्वीकारत असताना त्याला रंगेहाथ पकडण्यात आले. (Bribery in gram panchayat)
या कारवाईनंतर वैजापूर पोलीस ठाण्यात क्षीरसागर याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू झाली. तपासादरम्यान, त्याच्या घराची झडती घेण्यात आली. यात मोबाइल, पैसे, आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहन परवाना, मोटारसायकलची चावी आणि 700 रुपये रोख जप्त करण्यात आले. (Anti-corruption bureau trap)
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अपर पोलीस अधीक्षक मुकुंद अघाव, उपअधीक्षक सुरेश नाईकनवरे आणि सापळा अधिकारी उपअधीक्षक संगीता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. हवालदार राजेंद्र सिनकर, अंमलदार विलास चव्हाण आणि सी. एन. बागुल यांनी या कारवाईत सहभाग घेतला. (corruption news)
हे वाचलं का? – धक्कादायक! पतीने कोयत्याने वार करत पत्नीला संपवलं; रूममधील भिंतीवर उडाल्या रक्ताच्या चिळकांड्या, नेमकं काय घडलं?
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या या कारवाईमुळे भ्रष्टाचाराला आळा घालण्याचे प्रयत्न अधिक तीव्र झाले आहेत. स्थानिक प्रशासनात या घटनेमुळे खळबळ उडाली असून, भविष्यात अशा प्रकरणांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. (Headlines Marathi)
Get the latest Marathi news, Maharashtra news, and updates from politics, election, sports, entertainment, health, agriculture, business, and religion – only on headlinesmarathi.com.


