ग्रामसेवकाला मारहाण करणाऱ्या दोघांना दोन वर्षांचा तुरुंगवास! | Representative Image | Photo Credit: Canva, Edited

वैजापूर । दिपक बरकसे9

ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारांची माहिती मागितल्याच्या कारणावरून ग्रामसेवकाला मारहाण आणि शिवीगाळ (Gram Sevak assault) केल्याप्रकरणी दोन आरोपींना दोन वर्षांचा सश्रम कारावास आणि प्रत्येकी १५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. यापैकी १० हजार रुपये नुकसान भरपाई म्हणून फिर्यादीला देण्याचे आदेश सहायक सत्र न्यायाधीश एल. जी. पाच्छे यांनी दिले. उदय काशिनाथ सोनवणे (वय ३४, रा. खरज) आणि हमीद अहमद जिलानी (वय ३१, रा. वैजापूर) अशी दोषींची नावे आहेत.

काय आहे प्रकरण?

खरज येथील ग्रामसेवक कृष्णा नामदेव किरवे यांना २४ डिसेंबर २०१८ रोजी दुपारी १२:३० च्या सुमारास वैजापूर येथील पंचायत समिती कार्यालयात मारहाण झाली. किरवे हे टँकर प्रस्तावाच्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी कार्यालयात आले होते. यावेळी आरोपी उदय सोनवणे याने त्यांना फोन करून सभापतींच्या कक्षात बोलावले. तिथे उदय आणि हमीद जिलानी यांनी किरवे यांना कॉलरला धरून कक्षात ओढले. (RTI dispute Vaijapur)

माहितीच्या अधिकारावरून वाद

आरोपींनी किरवे यांना ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारांची माहिती तातडीने देण्याची मागणी केली. किरवे यांनी माहितीचा अधिकार कायद्यांतर्गत अर्ज स्वीकारून माहिती मुदतीत देण्याचे आश्वासन दिले. तसेच, अर्जाची पोचही आरोपींना दिली. मात्र, उदय याने “तू सरपंचाचे ऐकतोस, माहिती तर द्यावीच लागेल,” असे म्हणत किरवे यांना शिवीगाळ सुरू केली. यानंतर दोन्ही आरोपींनी किरवे यांना चापट-बुक्क्यांनी मारहाण केली. (Public servant attack)

हे वाचलं का? – हादरवणारी घटना! आधी मुलीचा गळा आवळून खून केला, मग स्वत:ला संपवलं…; पोलीस बापानं एवढं टोकाचं पाऊल का उचललं?

धमकी आणि कागदपत्रांची तोडफोड

आरोपींनी किरवे यांना “आमचे ऐकले नाहीस, तर नोकरी कशी करतो आणि गावात जिवंत कसा राहतो, हे बघू,” अशी धमकी दिली. याचवेळी त्यांनी किरवे यांच्या हातातील कागदपत्रांची पिशवी हिसकावून त्यातील कागदपत्रे फाडली आणि पुन्हा पिशवीत टाकली. मारहाणीमुळे किरवे यांना भोवळ येऊन ते तिथेच खाली पडले. (Vaijapur court verdict)

या घटनेची तक्रार वैजापूर पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आली. भादंवि कलम ३५३, ३२३, ५०४, ५०६ आणि ३४ अंतर्गत गुन्हा दाखल झाला. तपास अधिकारी भगवान डांगे यांनी तपास पूर्ण करून न्यायालयात आरोपपत्र सादर केले. अतिरिक्त सरकारी अभियोक्ता जी. सी. मंझा आणि सहायक सरकारी अभियोक्ता कृष्णा गंडे यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली. पैरवीसाठी सागर विघे यांनी सहाय्य केले. (Assault and threats case)

हे वाचलं का? – शाळेच्या आवारात रक्ताचा सडा! आठवीतल्या विद्यार्थ्याकडून दहावीतल्या विद्यार्थ्यावर चाकूने सपासप वार, जीवघेणा हल्ल्यात मुलाचा मृत्यू

न्यायालयाचा निर्णय

न्यायालयात सहा साक्षीदारांचा जबाब नोंदवण्यात आला, तर बचाव पक्षातर्फे उदय सोनवणे याने स्वतःचा जबाब नोंदवला. मात्र, बचाव पक्ष आपला बचाव सिद्ध करू शकला नाही. फिर्याद, साक्षीपुरावे आणि सरकारी अभियोक्त्यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीश पाच्छे यांनी दोन्ही आरोपींना दोषी ठरवले. त्यांना कलम ३५३ अंतर्गत दोन वर्षांचा सश्रम कारावास आणि १० हजार रुपये दंड (दंड न भरल्यास तीन महिने अतिरिक्त कारावास), तसेच कलम ३२३ अंतर्गत तीन महिन्यांचा साधा कारावास आणि ५ हजार रुपये दंड (दंडभरणा न झाल्यास तीन महिन्यांचा अतिरिक्त कारावास) अशी शिक्षा सुनावली. दंडातील १० हजार रुपये नुकसान भरपाई म्हणून फिर्यादीला देण्याचे आदेशही देण्यात आले. (Headlines Marathi)

ताज्या बातम्यांचे अपडेट्स थेट आपल्या फोनवर मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलला लगेच जॉइन करा! येथे क्लिक करा.

Get the latest Marathi newsMaharashtra news, and updates from politicselectionsportsentertainmenthealthagriculturebusiness, and religion – only on headlinesmarathi.com.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here