
वैजापूर । दिपक बरकसे
तालुक्यातील चांडगाव येथील लाभार्थ्यांना १०१९-२० मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजुर करुन एक हप्ता देण्यात आला. पण आता गायरानच्या जागेत घरकुल बांधता येणार नाही अशी भुमीका ग्रामपंचायतीने घेतली असुन लाभार्थ्यांनी लवकरात लवकर घरकुल बांधावे अशी नोटिस लाभार्थ्यांना बजावली आहे.
त्यामुळे मागील ४० ते ४५ वर्षापासुन गायरानात वास्तव्य करुन उदरनिर्वाह करणाऱ्या आदिवासी कुटुंबांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या कुटुंबांनी सोमवारी महिलांसह येथील पंचायत समिती कार्यालयात ठिय्या देऊन निदर्शने केली. गावरान जमीनीत घरकुल बांधण्यास परवानगी द्यावी अशी त्यांची प्रमुख मागणी आहे.
हे वाचलं का? – शेतीच्या बांधावरून वाद विकोपाला, मारहाणीत तरुणाचा जीव गेला
सोशालिस्ट पार्टीचे जिल्हाध्यक्ष विजय शिनगारे, उपाध्यक्ष साहेबराव दाभाडे, डवाळ्याचे सरपंच यशवंत पडवळ यांनी यावेळी मनोगत व्यक्त करत शासनाच्या भुमीकेचा निषेध केला.
त्यांच्यासह भारतीय बौद्ध महासभेचे एकनाथ बागुल यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीचे संजय बागुल, सविता मोरे, सुरेखा मोरे, रुख्मिणी दळे, विमल दळे, सुनील माळी, संतोष सोनवणे, सुनिता माळी, रंजना दळे, रंजना मतसागर, सुमन मतसागर आदींसह अनेक महिला पंचायत समिती कार्यालयात जमा झाल्या. त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले. हक्काचे घर मिळाले नाही तर पक्षाच्या वतिने कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला.
तुमच्या भागातील प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा


