दिल्लीच्या राजकारणात अण्णांची 'एन्ट्री', केजरीवालांचे 'टेन्शन' वाढणार?

दिल्लीत विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. ५ फेब्रुवारी रोजी विधानसभेसाठी मतदान होणार असून सत्ताधारी ‘आप’ आणि प्रमुख विरोधी पक्ष भाजपा यांच्यात सत्तेसाठी जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे. यासाठी सर्वपक्षीयांचा जोरदार प्रचार सुरू आहे.

त्यामुळे दिल्लीतील राजकीय वातावरण चांगलेच तापताना दिसत आहे. अशातच दिल्लीच्या राजकारणामध्ये आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची एन्ट्री झाली आहे. अण्णा हजारे यांनी दिल्लीतील मतदारांना एक सल्ला दिला आहे. कोणत्या उमेदवाराला मत द्यावे आणि कोणाला निवडून देऊ नये, याबाबत त्यांनी भाष्य केले आहे.

अण्णा हजारे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी निवडणुकीपूर्वी दिल्लीकरांना आवाहन केले आहे. अण्णा हजारे यांनी आपल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, मतदारांनी स्वच्छ विचारांच्या आणि चरित्राच्या लोकांनाच मत देण्याचा आग्रह आपण करत आहोत. जे सत्याच्या मार्गावर चालले आहेत आणि त्याग करायला तयार असतील, अपमान सहन करायला तयार असतील त्यांनाच मते द्या. जर भारताला वाचवायचे असेल तर बलिदान द्यावे लागेल. मतदान प्रक्रीयेत मी पितोय आणि दुसऱ्यांना पिण्याची सुविधा होईल असा दृष्टीकोन नसायला हवा असेही त्यांनी म्हटले आहे. अण्णा हजारे यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हे वाचलं का? –  धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर अजित पवार पत्रकारावर प्रचंड भडकले!

अण्णा हजारे यांनी दिल्लीत भ्रष्टाचार विरोधी आमरण उपोषण करीत देशभरात प्रसिद्धी मिळविली होती. त्यानंतर या आंदोलनात माजी सनदी अधिकारी असलेले अरविंद केजरीवाल आणि टीम उतरली होती. या आंदोलनानंतर अण्णा हजारे यांच्या मदतीमुळे भाजपाला जशी सत्ता मिळाली तशी दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या आप पक्षाला सत्ता मिळाली.

हे वाचलं का? –  महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? “शिंदेंची गरज संपली, आता नवीन…

आंदोलनानंतर २०१२ मध्ये अरविंद केजरीवाल आणि किरण बेदी,योगेंद्र यादव, कुमार विश्वास यांच्या टीमने आम आदमी पक्षाची स्थापना केली होती. साल २०१३ मध्ये या पक्षाची दिल्लीत सत्ता आली. परंतू आपला चेला अरविंद केजरीवाल याने राजकारणात येऊ नये अशी गुरु अण्णा हजारे यांची इच्छा होती. परंतू केजरीवाल यांनी त्यांचे काहीही न ऐकता सत्ता मिळविली आणि भाजपाची डोकेदुखी वाढवली. त्यामुळेच आता त्यांच्या या वक्तव्याला जास्त महत्त्व आले आहे.

मच्या भागातील प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here