शेतकऱ्याच्या डोळ्यादेखत स्वप्नांचा चुराडा, ४५ क्विंटल कापूस आगीच्या भक्ष्यस्थानी | प्रातिनिधिक छायाचित्र

पिकांचा पेरा केल्यापासून उत्पादनवाढीची स्वप्न बघायची आणि कधी निसर्गाच्या लहरीपणामुळे तर काही घटनांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान हे ठरलेलेच आहे. यामुळे वाढीव उत्पन्न तर सोडाच पण मेहनत आणि पैसा दोन्हीही वायाच. असाच प्रकार वैजापूर तालुक्यात घडला आहे.

वैजापूर तालुक्यातील बेलगाव शिवारात एक मार्च रोजी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास राहत्या घरात साठवून ठेवलेला ४५ क्विंटल कापूस आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. या कापसाची अंदाजे किंमत तीन लाख पंधरा हजार रुपये असल्याचे महसुली विभागाच्या पंचनाम्यात नमूद करण्यात आले आहे.

हे वाचलं का? – “संतोष देशमुखांची हत्या अनैतिक संबंधातून दाखवण्याचा प्लॅन, महिलाही तयार होती, पण…”; भावाचा खळबळजनक खुलासा

सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, शेतकरी आनंदा सुकाजी त्रिभुवन यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, त्यांनी शासनाकडे नुकसानभरपाईची मागणी केली आहे. ही घटना बेलगाव शिवारातील गट क्रमांक १७७ मधील शेतात घडली.

त्रिभुवन यांनी आपल्या शेतातील पत्र्याच्या खोलीत कापूस साठवून ठेवला होता. मात्र, रात्री अचानक लागलेल्या आगीत संपूर्ण कापूस जळून खाक झाला. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. घटनेची माहिती मिळताच तहसील कार्यालयाच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या वेळी संतोष त्रिभुवन, गोपीनाथ गायकवाड, संजय धिवर, करीम शाह, संतोष जठार उपस्थित होते.

हे वाचलं का? – शिंदे-फडणवीसांमध्ये नाराजीचा नवा अंक? शिंदेंच्या आमदारांची Y दर्जाची सुरक्षा काढली, आता केवळ…

दरम्यान, त्रिभुवन यांनी शासनाकडे नुकसानभरपाईची मागणी केली असून, लवकरच आमदार रमेश पाटील बोरनारे यांना यासंदर्भात निवेदन देणार असल्याचे सांगितले. या घटनेचा पंचनामा पुढील कार्यवाहीसाठी प्रशासनाकडे पाठवण्यात आला आहे. प्रशासनाकडून योग्य ती मदत मिळावी, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.

प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here