
वैजापूर । दिपक बरकसे
वैजापुर येथे श्री सुंदर गणपती मित्र परिवार आणि श्री गजानन महाराज भक्त परिवाराच्या वतीने संत गजानन महाराज प्रकट दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
गुरुवारी (२० फेब्रुवारी) या सोहळ्यात ग्रंथ व प्रतिमा मिरवणूक, काल्याचे कीर्तन, पारायणार्थींना भेटवस्तू, तसेच लकी कुपन वितरण अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उत्सवाची सुरुवात माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी आणि शिल्पा परदेशी यांच्या हस्ते पालखी पूजनाने झाली.
“गजानन महाराज की जय” आणि “गण गण गणात बोते” या जयघोषात, तसेच शोभेच्या आतषबाजीत मिरवणूक काढण्यात आली. कीर्तन सोहळ्यात आमदार रमेश पाटील बोरनारे, डॉ. दिनेश परदेशी, साबेरखान, धोंडिरामसिंह राजपूत, डॉ. राजीव डोंगरे, रामहरी जाधव, प्रकाश चव्हाण, दिनेश राजपूत, प्रेम राजपूत, बाळासाहेब संचेती, विशाल संचेती, ज्ञानेश्वर टेके, राजेंद्र साळुंके, पारस घाटे, इम्रान कुरेशी, सलीम तांबोळी यांसारख्या मान्यवरांनी हजेरी लावली.
या कार्यक्रमाचे संयोजन संस्थापक अध्यक्ष काशिनाथ आगाज, संतोष बोथरा, श्रावण चौधरी, श्याम पवार, अजय भुजबळ, गणेश धुमाळ, अशोक पवार खंडाळकर, संदीप बसवेकर, दशरथ बनकर, गिरीश चापानेरकर, शैलेश पोंदे आदींनी केले. तसेच राजू पुणे, दीपक आहेर, कुणाल जगताप, निशिकांत पवार, निलेश लाडवाणी, महेश धुमाळ, श्याम आगाज, सचिन दाढे, सुशील पवार, सुरेश मगर, मिलिंद जंगम, बेबी आगाज यांचाही सक्रिय सहभाग होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धोंडिरामसिंह राजपूत यांनी केले, तर संतोष बोथरा यांनी आभार मानले.
तुमच्या भागातील प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा



