
गेल्या काही दिवसांपासून अभिनेता राहुल सोलापूरकर चर्चेत आला होता. एका पॉडकास्टमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबाबत त्याने केलेल्या एका विधानावरून वाद निर्माण झाला होता. राहुल सोलापूरकरच्या या विधानासाठी सामान्य नागरिकांप्रमाणेच राजकीय वर्तुळातूनही टीका-टिप्पणी केली जात होती. यानंतर अखेर सोलापूरकरचं टाळकं ठिकाण्यावर आलं. एक व्हिडीओ प्रसिद्ध करून राहुलने दिलगिरी व्यक्त केली आहे. पण सरळ माफी मागण्याचं मात्र टाळलं आहे. (Rahul Solapurkar controversy)
काही दिवसांपूर्वी राहुल सोलापूरकरने एक मुलाखत दिली होती. त्यात त्याने अकलेचे तारे तोडत म्हटलेले की, छत्रपती शिवाजी महाराज यांनी आग्र्याहून सुटका करण्यासाठी औरंगजेबाच्या बायकोला लाच दिली होती. त्या काळात कोणतेही पेटारे वगैरे नव्हते. शिवाजी महाराज हे आग्राहून लाच देऊन सुटले होते. यावर मोठा वादंग निर्माण झाल्यानंतर आता राहुल सोलापूरकर याने या विधानामागची नेमकी भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच, या विधानामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या असतील, तर त्यासाठी मन:पूर्वक दिलगिरी व्यक्त करतो, असंही त्याने जारी केलेल्या एका व्हिडीओमध्ये नमूद केलं आहे. (Chhatrapati Shivaji Maharaj statement)
जारी केलेल्या व्हिडीओमध्ये राहुल म्हणतोय की, “छत्रपती शिवाजी महाराज की जय. दीड ते दोन महिन्यांपूर्वी रिमा अमरापूरकर यांच्या एका पोडकास्टसाठी मी ५० मिनिटांचा एक व्हिडीओ केला होता. त्या मुलाखतीमध्ये बोलताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अग्र्यातून सुटका या विषयावर बोलत होतो. बिकानेरच्या राजवाड्याचे पुरावे, राजस्थानची काही कागदपत्रे, फारसी, उर्दू तसेच औरंगजेबाच्या नजीकच्या लोकांच्या काही गोष्टी वाचायला अभ्यास करण्यासाठी मिळाल्या होत्या. त्यामधील काही गोष्टी सांगताना मी काही विधाने केली. यावेळी, महाराजांनी कोणाला रत्ने दिली, कोणाला पैसे दिले, काय काय केले? हे सांगत असताना याचे एकत्रीकरण करताना महाराजांनी इतर लोकांना कशापद्धतीने आपल्या बाजूने वळवून स्वतःची कशी सुटका करून घेतली? हे सांगत होतो. यावेळी मी लाच हा शब्द वापरला.” असे स्पष्टीकरण त्याने दिले आहे. (Maharashtra politics)
हे वाचलं का? – रात्रीच्या प्रवासातील ‘डेथ अवर्स’! अभ्यासातून धक्कादायक माहिती समोर
पुढे म्हणाला की, “साम, दाम, दंड, भेद या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज हे फार मोठे राज्यकर्त्ये होऊन गेले, हे मी सांगण्याची गरज नाही. फक्त कोणी तरी दोन वाक्य काढून वाद निर्माण केला. यात कोणताही माझा हेतू नाही. नखंभरसुद्धा अपमान करण्याचा हेतू माझा नाही. कथा कशी रंगवली जाते हे सांगताना माझ्याकडून चूक झाली. माझ्या विधानामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो. कोणाच्या भावना दुखावल्या असेल तर माझ्याकडून स्वप्नात काहीही होणार नाही. तुम्ही म्हणत असाल तर मी या पुढे शिवाजी महाराजांबद्दल बोलणारही नाही. कृपया शिवभक्तांनी वाद थांबवावा. मी मनपूर्वक दिलगिरी व्यक्त करतो. लाचखोर माणसेही औरंगजेबाकडे होती. मी पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो,” असे म्हणत दिलगिरी व्यक्त केली आहे.
दरम्यान, ही चूक अक्षम्य असल्यानं फक्त माफी मागितली म्हणून माफ करु नका, तर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करा अशी मागणी आता होतेय. अजित पवार यांच्या पक्षाचे आमदार अमोल मिटकरी, ठाकरेंच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी ही मागणी केली आहे. (Chhatrapati Shivaji Maharaj history debate)
हे वाचलं का? – धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर अत्याचारासाठी १०० रुपयांची सुपारी, हत्येचा ही होता प्लॅन पण…; इंग्रजी शाळेतील खळबळजनक प्रकार
अमोल मिटकरी यांनी याबद्दल बोलताना म्हटलंय की, राहुल सोलापुरकरने थातुरमातुर दिलगिरी व्यक्त केली असली तरी हिरकणीबद्दल केलेलं वक्तव्य, मोईनखान, पेटारे नसल्याची बतावणी, आग्रा सुटकेत हुंडा वठवल्याचे पुरावे अद्याप सादर केले नाहीत. त्याने दिलगिरी सुद्धा नशा करुन मागितली आहे. याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे.
सुषमा अंधारे यांनीही राहुल सोलापूरकरवर कारवाईची मागणी केली आहे. चौफेर टीके नंतर राहुल सोलापूरकर याने छत्रपती शिवरायांच्या संबंधाने केलेल्या वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त केली आहे. मात्र ठरवून आधी खोडसाळपणा करणारे आणि नंतर दिलगिरी व्यक्त करणाऱ्या अशा खोडसाळ प्रवृत्तीकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. IPC 295 अंतर्गत राहुल सोलापूरकर वर गुन्हा दाखल व्हायला हवा. शिवाय हा सोलापूरकर च्या प्राच्यविद्या भांडारकर संस्थेचा पदाधिकारी आहे या संस्थेला मिळणाऱ्या शासकीय मदत निधीची सुद्धा चौकशी व्हायला हवी. कारण अनेक वर्षांपूर्वी जेम्स लेन प्रकरणात राष्ट्रमाता जिजाऊंच्या संबंधाने बदनामीकारक मजकूर छापण्यास मदत करणारे भांडारकर ट्रस्ट शीच संबंधित होते. असं सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.
हे वाचलं का? – नाशिकमध्ये भीषण अपघात! खासगी बस दरीत कोसळली, ७ जण ठार

राहुल सोलापूरकर काय म्हणाला होता?
मुलाखतीमध्ये राहुल म्हणाला की, छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून लाच देऊन सुटले. तेव्हा तिथे पेटारे वगैरे काही नव्हते. छत्रपती शिवाजी महाराज लाच देऊन महाराष्ट्रात परत आले. त्यासाठी त्यांनी किती हुंडी वटवल्या याचे पुरावे देखील आपल्याकडे आहेत. शिवाजी महाराजांनी औरंगजेबाचा वजीर आणि त्याच्या बायकोला देखील लाच दिल्याचे पुरावे इतिहासात आहेत. मोहसीन खान किंवा मोईन खान नावाच्या सरदाराकडून त्यांनी सही शिक्याचा अधिकृत पत्र घेतलं होतं. त्याच्याकडून घेतलेल्या परवाना दाखवूनच महाराज आग्र्यातून. सर्वात शेवटी स्वामी परमानंद पाच हत्ती घेऊन आग्र्याहून आले. त्यासंदर्भातले खूण आणि पुराव्या देखील आहेत. हा सगळा इतिहास कथा स्वरूपात सांगायचं म्हटलं की थोडे रंग भरून सांगावा लागतो पण रंजकता आली की इतिहासाला छेद पडतो. (Rahul Solapurkar podcast issue)
प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा


