दिल्ली विधानसभेसाठी मतदान सुरू! आप-भाजप-काँग्रेसमध्ये लढत, ‘हे’ मुद्दे निर्णायक ठरणार

दिल्ली विधानसभा निवडणूक २०२५ साठी आज मतदान होत आहे. दिल्लीचा तख्त कोण जिंकणार याचा फैसला आज होणार आहे. दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी मतदान होत असून ६९९ उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीमध्ये बंद होणार आहे.

१.५६ कोटींहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली आहे. मतदान केंद्रावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर दिल्लीकरांनी सकाळपासून गर्दी केली आहे.

माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षानं (आप) सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळवण्यासाठी सर्व राजकीय शक्ती पणाला लावली आहे. तर भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि काँग्रेसनं पुन्हा एकदा सत्ता स्थापन करण्याकरिता विधानसभा निवडणुकीत जोरदार प्रयत्न केले आहेत. उल्लेखीय बाब म्हणजे इंडिया आघाडीचे घटकपक्ष असलेले काँग्रेस आणि आपचे उमेदवार दिल्ली विधानसभा निवडणुकीत आमने-सामने उभे राहिले आहेत. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची झाली आहे.

हे वाचलं का? – रात्रीच्या प्रवासातील ‘डेथ अवर्स’! अभ्यासातून धक्कादायक माहिती समोर

दिल्लीच्या निवडणुकीत कोणते मुद्दे निर्णायक ठरणार?

दिल्ली विधानसभा निवडणुकीत यंदा मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे. २०१५ मध्ये ६७.१३ टक्के तर २०२० मध्ये ६२.५९ टक्के मतदान झाले होते. यंदा ही टक्केवारी वाढल्यास कोणाला फायदा होणार, हे महत्त्वाचे ठरणार आहे.

२००४ नंतर मतदारांचा कल स्पष्ट दिसून आला आहे. लोकसभेसाठी एका पक्षाला आणि विधानसभेसाठी दुसऱ्या पक्षाला मतदान करण्याचा पद्धतीचा अवलंब झाला आहे. दिल्लीच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाकडे अरविंद केजरीवाल तर भाजपकडे नरेंद्र मोदी यांचा चेहरा आहे. त्यामुळे निवडणूक दोघांसाठी महत्त्वाची ठरणार आहे. भाजपने हरयाणा आणि महाराष्ट्रात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मदतीने मोठे यश मिळवले आहे. आता दिल्ली विधानसभेसाठी ५० जागांचे लक्ष्य ठेवले आहे. मात्र आम आदमी पक्ष देखील त्यांना तगडे आव्हान देत आहे.

प्रत्येक निवडणुकीत मिळणारे यश हे त्या पक्षांच्या कार्यकर्त्यांवर अवलंबून असते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मदतीने भाजपने हरयाणा आणि महाराष्ट्रात अभूतपूर्व यश संपादन केले आहे. दिल्ली विधानसभेसाठी देखील संघाने अविरत मेहनत घेतली असल्याचे म्हटले जात आहे. भाजपने ५० जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. मात्र त्यांच्यासमोर असणारे आम आदमी पक्षाचे आव्हान देखील तितकेच तगडे असणार आहे.

हे वाचलं का? – धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर अत्याचारासाठी १०० रुपयांची सुपारी, हत्येचा ही होता प्लॅन पण…; इंग्रजी शाळेतील खळबळजनक प्रकार

विधानसभेचा प्रचार संपल्यानंतर दिल्ली येथे कोण जिंकणार याबद्दल फलोदी सट्टा बाजारात एक अंदाज मांडण्यात आला आहे. नवी दिल्ली मतदारसंघात माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे निवडणूक लढवत आहेत. तर भाजपकडून प्रवेश वर्मा आणि कॉँग्रेसकडून संदीप दीक्षित हे निवडणूक लढवत आहेत. संदीप दीक्षित हे माजी मुख्यमंत्री शिला दीक्षित यांचे पुत्र आहेत.

यंदाची दिल्लीची विधानसभा निवडणूक आम आदमी पक्षासाठी कठीणच जाऊ शकते असे म्हटले जात आहे. यंदाची निवडणूक भाजप पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात लढवत आहे. ज्यामुळे आम आदमी पक्ष आणि भाजपमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळण्याचा अंदाज आहे. फलोदी सट्टा बाजारच्या नव्या अंदाजानुसार, दिल्ली विधानसभेत भाजपला ३४ ते ३६ जागा मिळू शकतात. तर आम आदमी पार्टीला देखील ३४ ते ३६ जागांवर विजय मिळू शकतो. म्हणजेच यंदा दोघांमध्ये जोरदार लढत होताना पाहायला मिळू शकते.

या निवडणुकीत सर्वात जास्त चर्चा ही नवी दिल्लीच्या जागेची होत आहे. या जागेवर आपला विजय होणार असा विश्वास संदीप दीक्षित यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान फलोदी सट्टाबाजारच्या नवीन अंदाजानुसार, या ठिकाणी केजरीवाल यांना धक्का बसू शकतो. तसेच भाजपचे प्रवेश वर्मा हे विजयी होऊ शकतात.

हे वाचलं का? – नाशिकमध्ये भीषण अपघात! खासगी बस दरीत कोसळली, ७ जण ठार

काय आहे दिल्लीच्या जनतेचा मूड?

सी-वोटरने दिल्लीच्या जनतेला सरकार बदलायचे आहे का? अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले होते. १ फेब्रुवारीपर्यंत घेतलेल्या अंदाजानुसार ४३.९ टक्के जनता ही सध्याच्या सरकारच्या कामावर नाराज आहे. तसेच त्यांना यावलेस सत्ता बदल हवा आहे, असे जनतेचे मत दिसून आले. १० ते ११ टक्के जनता नाराज आहे पण त्यांना सरकार बदलण्यात रस दिसून येत नाहीये. तसेच ३८.३ टक्के नाराज नसून, त्यांना सरकार बदलायचे नाही असे त्यांचा मूड आहे. सरकार बदलायचे आहे बदलायचे नाही यामध्ये समान टक्केवारी पाहायला मिळत आहे. त्यामुळे दिल्लीची जनता नक्की कोणाला साथ देणार हे ८ तारखेलाच स्पष्ट होणार आहे.

निवडणूक आयोगानं दिल्लीतील सर्व मतदान केंद्रांवर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे. मतदान निष्पक्ष आणि शांततापूर्ण वातावरणात व्हावे, यासाठी मतदान केंद्रांवर सीआरपीएफच्या २२० कंपन्या, १९,००० होमगार्ड जवान आणि ३५,६२६ दिल्ली पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. यासोबतच संवेदनशील मतदान केंद्रांवरील सुरक्षेवर खास लक्ष ठेवण्यात येणार आहे. मतदान केंद्रांवर नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. निवडणूक आयोगाकडून मिळालेल्या माहितीनुसार, यावेळी दिल्ली विधानसभा निवडणुका यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी एकूण ९७,९५५ कर्मचारी आणि त्याचबरोबर ८,७१५ स्वयंसेवक कार्यरत असणार आहेत.

प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here