सिलिंडर स्फोट नव्हे, खलिस्तानी हल्ला! कुंभमेळ्यातील आग प्रकरणात नवा खुलासा

प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभ परिसरात रविवारी भीषण आग (Mahakumbh Mela 2025 Fire Tragedy) लागली. सिलिंडर ब्लास्टमुळं ही आग लागल्याची माहिती पोलिसांनी दिली होती पण हे सिलिंडर स्फोट दहशतवादी संघटनेने घडवून आल्याची माहिती पुढे आली आहे.

माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, कुंभमेळ्यामध्ये लागलेली आगीच्या घटनेची खालिस्तान जिंदाबाद फोर्स (KZF) या दहशतवादी संघटनेने जबाबदारी स्वीकारली आहे. संघटनेने याबाबत काही माध्यम संस्थांना ई-मेल पाठवला आहे, ज्यामध्ये हा पिलीभीत बनावट चकमकीचा बदला असल्याचे म्हटले आहे. हा स्फोट म्हणजे सीएम योगींना दिलेला इशाराच आहे. ही सुरुवात आहे, असं म्हटलं आहे. यामुळे कुंभमेळ्यावर खालिस्तानी संस्थेच्या हल्ल्याचे सावट असल्याचे दिसून येत आहे.

हे वाचलं का? – १ रुपयांत पीक विमा योजनेत गैरप्रकार, योजना खरंच बंद होणार?; काय म्हणाले राज्याचे कृषीमंत्री?

नेमकं झालं काय?

प्रयागराजमधील कुंभमेळ्यामधील सेक्टर १९-२० मध्ये आग लागली होती. जोरात वाहणाऱ्या वाऱ्यामुळे ही आग मोठ्या प्रमाणात पसरली. अग्निशमन दलाच्या सहा गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल होत या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत होत्या. पोलीस आणि एनडीआरएफच्या टीम्सनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आसपासचे हिस्से रिकामे केले.

शास्त्री पुल आणि रेल्वे पुल दरम्यान ही आग लागली होती. हा पूर्ण भाग महाकुंभ क्षेत्रामध्ये येतो. टेंटमध्ये ठेवलेल्या सिलेंडर्सचे एकापाठोपाठ एक ब्लास्ट झाले, त्यामुळे आगीने विक्राळ रुप धारण केलं. सिलेंडर ब्लास्टमुळे आग वेगाने पसरली. आगीच्या या घटनेमुळे संपूर्ण क्षेत्रात एकच घबराट, गोंधळाची स्थिती निर्माण झाली.

तुमच्या भागातील प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here